पुणे प्रहार : आई फाउंडेशन पुणे तर्फे आर.एस.डान्स क्रिव शेवाळेवाडी मांजरी पुणे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेले ५वे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
आई फाउंडेशन पुणे तर्फे मुलांचे व नृत्य कलाकारांच्या गुणांना वाव मिळवण्यासाठी तसेच सामाजिक कलेची जाणीव ठेवून त्यांना प्रेरणा देण्यासाठी आर.एस. डान्स.क्रिव शेवाळवाडी, मांजरी पुणे यांच्या मार्फत त्याचे ५वे वार्षिक स्नेहसंमेलन दि. १६.१२.२०२३ रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन विठ्ठलराव शिवरकर रोड, फातिमानगर पुणे येथे आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमामध्ये १५० कलाकारांनी सहभाग नोंदविला होता. त्यात ८० मराठी, हिंदी गाण्यावर अत्यंत उत्कृष्ट असे नृत्य सादर करण्यात आले. तसेच कार्यक्रमामध्ये सामाजिक जाणीव ठेवून रामायण तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील घडामोडींबाबत उत्कृष्ट असे नृत्य सादर करण्यात आले.
कार्यक्रमामधील सगळे कलाकार हे आर.एस. डान्स क्रिव.क्लासचे सदस्य होते. सर्व कलाकारांच्या नृत्याची आखणी आर.एस.डान्स क्रिव क्लासचे श्री.राहूल कसबे सर व सौ. सुप्रिया राहूल कसबे यांनी केली होती.
कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री विजय (भाऊ) चौधरी (अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तथा पुणे ट्रिपल महाराष्ट्र केसरी व विश्वविजेता) तसेच त्याची पत्नी सौ. कोमल विजय चौधरी (राष्ट्रीय जलतरणपटू) हे उपस्थित होते.
सदरच्या कार्यक्रमास विषेश सहकार्य करणारे. आई फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे श्री. प्रेम कल्याणी (सचिव आई फाउंडेशन, पुणे) व सौ. निशा गणेश भापकर, संस्थापक सदस्य आई फाउंडेशन, पुणे हे उपस्थित होते.