एल अँड टी फायनान्स होल्डींग्ज चा वित्तीय वर्ष २०२३ -२४ च्या तिसऱ्या तिमाहीत ६४०  कोटी रुपयांचा उच्चांकी (एकत्रित) करोत्तर नफा

पुणे , जानेवारी २०२४ : देशातील दिग्गज नॉनबँकींग वित्तीय कंपनी असलेल्या एल अँड टी फायनान्स होल्डींग्ज लिमिटेड ने ३१ डिसेंबर २०२३ ला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीसाठी ६४० कोटी रुपयांचा एकत्रित नफा नोंदविला आहेगतवर्षातील तिसऱ्या तिमाहीच्या तुलेनत नफ्यात घसघशीत ४१ टक्के वाढ झाली आहे.

कंपनीने आपल्या एकूण कर्जपुस्तिकेत विविध रिटेल कर्जाच्या पोर्टफोलिओचे प्रमाण ९१ टक्क्यांवर नेले आहेकंपनीने आखलेल्या लक्ष्य २०२६ या आपल्या उद्दीष्टांतर्गत रिटेल कर्जाचे ८० टक्क्यांपेक्षा अधिक उद्दीष्ट्य कंपनीने साध्य केले आहेकंपनीने लक्ष्य  २०२६ची उद्दीष्टे निर्धारित कालावधीच्या दोन वर्ष अगोदर गाठण्यात यश मिळविले आहे.    

कंपनीने ग्राहककेंद्रीत डिजीटल ॲपल्किशेन– प्लॅनेट ॲपचा वित्तीय वर्ष २०२१- २२ मधील चौथ्या तिमाहीत शुभारंभ केला होता आणि या ॲपने आत्तापर्यंत ७६ लाख डाऊनलोडचा टप्पा ओलांडला आहेअशा प्रकारे हे ॲप  ग्राहकांसाठी एक सक्षम असा डिजीटल चॅनेल ठरला आहे

३१ डिसेंबर २०२३ ला सपंलेल्या तिसऱ्या तिमाहीत रिटेल कर्जवितरण १४,५३१ कोटी रुपयांवर झेपावले असून त्यात वार्षिक २५ टक्के वाढ नोंदविली गेली आहेरिटेल फायनान्समध्ये एलटीएफएचचे आत्तापर्यंतेच ही उच्चांकी त्रैमासिक रक्कम ठरले आहे आणि सर्व रिटेल विभागांमध्ये जोरदार वाढ कंपनीने साध्य केली आहेकंपनीची रिटेल पुस्तिका आता ७४ हजार ७५९ कोटी रुपयांवर गेली आहे३१ डिसेंबर २०२२ च्या तुलनेत त्यात ३१ टक्के वाढ झाली आहे.

एल अँड टी फायनान्स होल्डींग्ज लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  सुदीप्ता रॉय म्हणालेमला हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे कीआम्ही आमची लक्ष्य २०२६’ मधील सर्व उद्दीष्टे दोन वर्ष आधीच साध्य केली आहेत९१टक्के  रिटेललायझेशनसहआम्ही ग्रामीण आणि शहरी परिसंस्थेमध्ये विखुरलेल्या रिटेल एनबीएफसीमध्ये परिवर्तित झालो आहोतआमच्या कामगिरीत सातत्यपूर्णता राखताना तिच्याबाबत अंदाज बांधण्याची खात्री निर्माण करणे तसेच लक्ष्य योजनेतील ध्येये शाश्वत बनविणेहे आगामी काळात आमचे मुख्य लक्ष राहणार आहे.

हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठीआम्ही आमचे लक्ष रणनीतीच्या आधारे ५ प्रमुख स्तंभांच्या अंमलबजावणीवर केंद्रित केलेले आहे आणि ते पाच स्तंभ म्हणजे मार्ग तयार करणे आणि संलग्न/नवीन उत्पादनांद्वारे ग्राहक मिळवत जाणेएकरेषीय अंडररायटिंगपासून बहुरेषीय अंडररायटिंगकडे वळत क्रेडिट अंडररायटिंग अतिशय सक्षम आणि बळकट करणे म्हणजेच क्रेडिट ब्युरोबरोबरच अकाउंट एग्रीगेटर आणि ऑर्थोगोनल सिग्नल्सच्या माध्यमातून क्रेडिट अंडररायटिंग वाढविणेभविष्यकालीन डिजिटल आराखडा तयार करणेवाढीव मौखिक प्रसिध्दीच्या माध्यमातून ब्रँडची दृश्यमानता वाढवणे आणि टेक टॅलेंट वाढवून क्षमताविस्तार करणे हे ते पाच स्तंभ होय.