पोलिसांची कसलीच भीती नाही! भर दिवसा डोक्यात गोळ्या घालून हत्या

पाटणा- बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका मटन शॉप मालकाला दोन बाईकस्वारांनी भर दिवसा डोक्यात गोळ्या घालून ठार मारलं आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तो व्हायरल होत आहे.

Pune Crime News : पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्याची हत्या, चार जणांनी मिळून एकाला संपवलं

मृत व्यक्तीचं नाव अफरोज खत्री असल्याचं कळंतय. तो रामबाग चौकात एक मटन शॉप चालवतो. खत्री सकाळी आपल्या दुकानाकडे जात असताना ही घटना घडली. हल्लेखोरांनी दोन गोळ्या खत्री यांच्या डोक्यात घातल्या. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आईच्या डोळ्यासमोर डंपरने चिमुकल्याला चिरडलं, जागीच मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना

सीटीटीव्ही फूटेजमध्ये दिसतंय की, एक व्यक्ती रस्त्यावरुन जात आहे. दोन बाईकस्वार त्याच्या मागून येत आहेत. त्यातील मागे बसलेला व्यक्ती बंदूक काढतो आणि रस्त्यावरुन चालणाऱ्या व्यक्तीला निशाणा बनवून गोळी चालवतो. यात गोळी लागलेला व्यक्ती रस्त्यावर पडतो. दरम्यान, हल्ल्यामागचा हेतू समजू शकलेला नाही. आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मालक कामावरून काढून टाकणार, भर रस्त्यात केला चाकू हल्ला; घटनेचा व्हिडिओ आला समोर

भर दिवसा झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. स्थानिक लोक घटनास्थळी जमा झाले. सर्व प्रकार पाहून ते आक्रमक झाले. पोलिसांना देखील त्यांनी सुरुवातील मृतदेहाजवळ येऊ दिलं नाही. मध्यस्थीनंतर पोलिसांनी मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवलं आहे. काही काळ परिसरात तणावाची स्थिती होती. मात्र, पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली आहे.