कात्रजच्या नवीन बोगद्यात ४-५ वाहने एकमेकांवर धडकली; धक्कादायक फोटो समोर

कात्रजच्या नवीन बोगद्यात ४-५ वाहने एकमेकांवर धडकली; धक्कादायक फोटो समोर

धनकवडी: कात्रज नवीन बोगद्याच्या आत मध्ये दुरुस्तीचे काम चालू आहे.

त्यादरम्यान एक चारचाकी वाहन अचानक थांबल्यामुळे त्याच्या पाठी मागे असलेली चार ते पाच वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाला आहे. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी नसून वाहनांचे नुकसान झालेले आहे.

दरम्यान घटनास्थळी भारती विद्यापीठ वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे, तसेच वाहतूक विभागाकडील अंमलदार तात्काळ दाखल झाले असून अपघात ग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली आहेत, तसेच वाहतूक हि सुरळीत करण्यात आली आहे.