इंडियन ऑइलने मंजुषा कंवर यांना जीवनगौरवसाठी मेजर ध्‍यानचंद पुरस्‍कार मिळाल्‍याबद्दल केले सन्‍मानित

पुणे, २८ डिसेंबर २०२३ : पुणे येथे आयोजित दिमाखदार समारोहामध्‍ये इंडियन ऑइलने मिनिस्‍ट्री ऑफ युथ अफेअर्स अॅण्‍ड स्‍पोर्ट्सने क्रीडा व खेळामधील जीवनगौरवसाठी मेजर ध्‍यानचंद पुरस्‍कारासह सन्‍मानित केलेल्‍या माजी प्रतिष्ठित बॅडमिंटनपटू आणि इंडियन ऑइल कर्मचारी मंजुषा कंवर यांचा गौरव इंडियन ऑइलच्या वतीने, पुणे विभागीय कार्यालयातील विभागीय संस्थात्मक व्यवसाय प्रमुख कविता टिकू, पुणे विभागीय कार्यालयाचे विभागीय एलपीजी-विक्री प्रमुख भाविन राडिया, पूना जिल्हा महानगर बॅडमिंटन संघटनेचे सचिव रणजीत नातू, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन पंच गिरीश नातू आणि कंवर यांचे प्रशिक्षक डॉ. अतुल गडगकर यांच्‍या हस्‍ते त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. आपल्‍या कामगिरीच्‍या माध्‍यमातून क्रीडामध्‍ये योगदान दिलेल्‍या आणि निवृत्तीनंतर देखील क्रीडा स्‍पर्धांच्‍या प्रचारात योगदान देत राहणाऱ्या व्‍यक्‍तींना या पुरस्‍कारासह सन्‍मानित केले जाते.

कॉर्पोरेशन आणि आपले प्रशिक्षक, टीममधील सदस्‍य व कुटुंबियांचे आभार व्‍यक्‍त करत मंजुषा कंवर म्‍हणाल्‍या, ”मला सुरूवातीच्‍या वर्षांमध्‍ये श्री. वसंत गोरे (प्रख्यात बॅडमिंटन प्रशिक्षक) यांचे मार्गदर्शन मिळाले, जे माझ्यासाठी गॉडफादर होते. समाजाचे ऋण फेडा, असे ते नेहमी म्हणायचे. इंडियन ऑइलमधील माझ्या कारकिर्दीतून मी समाजाचे ऋण फेडण्‍याचा प्रयत्न करत आहे. मला अंडरडॉग म्हणून ओळखले जाते, जे माझे सामर्थ्य बनले, ज्‍यामुळे मला आव्‍हानात्‍मक खेळांमध्‍ये देखील माझा स्‍वाभाविक खेळ खेळता आला आणि देशासाठी अभिमानास्‍पद कामगिरी करण्‍यास मदत झाली. खेळ व खेळाडूंना सतत प्रेरणा देणाऱ्या इंडियन ऑइलसोबत काम करणे हे माझे भाग्‍य आहे. इंडियन ऑइलने प्रबळ क्रीडा संस्‍कृती घडवण्‍यामध्‍ये काही अग्रणी उपक्रम हाती घेतले आहेत.”

तत्‍पूर्वी, इंडियन ऑइल चे अध्‍यक्ष एस. एम. वैद्य यांनी सर्व विजेत्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या आणि त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय कामगिरीचे कौतुक केले. श्री. वैद्य म्‍हणाले, ”त्‍यांची अथक मेहनत आणि निर्धार सर्वांसाठी प्रेरणास्रोत ठरले आहेत. सर्व विजेत्‍यांचे अभिनंदन आणि त्‍यांची यशस्‍वी कामगिरी इतरांना प्रेरित करण्‍यासह त्‍यांच्‍यामध्‍ये खेळाडूवृत्तीची भावना जागृत करो ही सदिच्‍छा.”

बॅडमिंटन जगतातील प्रेरक व्‍यक्तिमत्त्व असलेल्‍या मंजुषा कंवर यांनी १९९१ ते २००४ पर्यंत १२ वर्ष भारताचे प्रतिनिधित्‍व केले आहे. १९९८ मध्‍ये कॉमनवेल्‍थ गेम्‍स कांस्‍य पदक आणि ११९४ मध्‍ये उबेर कप येथे विमेन्‍स टीमचे कर्णधारपद अशा उत्तम कामगिरीसह मंजुषा यांनी उत्तमरित्‍या नेतृत्‍व भूमिका पार पाडली आहे.

वर्ष १९९३ मध्‍ये इंडियन ऑइलमध्‍ये सामील होण्‍यासह सध्‍या नवी दिल्‍लीमधील इंडियन ऑइल येथे स्‍पोर्ट्स सेलच्‍या प्रमुख म्‍हणून कार्यरत असलेल्‍या मंजुषा कंवर भारतात क्रीडाच्‍या विकासाप्रती मोठ्या प्रमाणात योगदान देत आहेत. त्‍यांचा बहुआयामी प्रवास बॅडमिंटन कोर्टवरील त्‍यांच्‍या यशस्‍वी कामगिरी मधून, तसेच सर्वसमावेशक क्रीडा धोरणांना आकार देण्‍यामधील, उद्योन्‍मुख टॅलेंट्सना मार्गदर्शन करण्‍यामधील आणि लैंगिक सर्वसमावेशकतेला चालना देण्‍यामधील त्‍यांच्‍या महत्त्वपूर्ण भूमिकेमधून दिसून येतो. कुमारी मंजुषा यांची भारतीय क्रीडामध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याप्रती कटिबद्धता स्‍पोर्ट्स स्‍कॉलरशिप स्किम आणि इंडियन ऑइल शक्‍ती प्रोजेक्‍ट यांसारख्‍या उपक्रमांच्‍या माध्‍यमातून सार्थ ठरते. ज्‍यामुळे कॉर्पोरेशनचा सर्वोत्तम क्रीडाला पाठिंबा देण्‍यामध्‍ये प्रेरणास्रोत म्‍हणून त्‍यांचा दर्जा अधिक दृढ होतो.