२१ डिसेंबरचे राशीभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

गुरुवार, 21 डिसेंबर रोजी रेवती नक्षत्रामुळे वरियान नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 6 राशीच्या लोकांना दिवस लाभाचा असून नोकरी-धंद्यात यशाचे नवे दरवाजे उघडले जाऊ शकतात. व्यापारात सुसंधी चालून येतील. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

मेष : शुभ रंग:गुलाबी, शुभ अंक : ९

अत्यावश्यक देणी चुकवावी लागतील. दूरच्या प्रवासात आपले मौल्यवान ऐवज सांभाळा. घरात मोठयांची मने जपावी लागतील. आज क्षणिक मोहात अडकू नका.

वृषभ : शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ९

जसे चिंताल तसे होईल. आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून तुमची काही अपूरी स्वप्ने साकार होतील. व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. छान दिवस.

मिथुन : शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ८

उद्योग धंद्याच्या दृष्टीने अनूकुल दिवस असून नोकरीत वरीष्ठ खूष असतील. अधिकार योग चालून येतील. हाताखालच्या लोकांवर वचक राहील. म्हणाल ती पूर्व.

कर्क : शुभ रंग:मरून, शुभ अंक : ५

आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. महत्वाच्या घरगुती प्रश्नांत वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या. वाहतूकीचे नियम मोडू नका. दंड भरावा लागेल.

BIG NEWS : महाराष्ट्रातील या जिल्ह्यात ओमायक्रॉन JN1 (Omicron corona Variant Jn1)चा शिरकाव, पुरुषाला लागण; जिल्हास्तरावर खबरदारी घेण्याच्या सूचना

सिंह : शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : ४

नवीन ओळखीत लगेच विश्वास टाकू नका. आज मित्रही दगा देतील. कार्यक्षेत्रात ही सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. गाडी चालवताना स्टंट नकोत.

कन्या : शुभ रंग:क्रिम, शुभ अंक : ९

व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. वादविवादात आपलीच मते इतरांवर लादू शकाल. आज वैवाहीक जिवनात गोडीगुलाबी राहील.

तूळ : शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : १

काही जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ मंडळींना काही आरोग्य विषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. विद्यार्थ्याना स्पर्धेत यश मिळेल.

वृश्चिक : शुभ रंग: निळा, शुभ अंक : ६

आज उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण राहील. व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. गृहीणी आज पार्लरसाठी आवर्जुन वेळ काढतील.

धनु : शुभ रंग:आकाशी, शुभ अंक : १

धंद्यात येणी वसूल होतील. कार्यक्षेत्रात आज स्वत:चे महत्व सिध्द करू शकाल. गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेणे आज तुम्हाला जमेल. गरजूंना मदत कराल.

मकर : शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : २

आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. अती उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल. आज प्रवासात काही नवे हितसंबंध जुळून येतील. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल.

कुंभ : शुभ रंग:डाळिंबी, शुभ अंक : ३

कठोर बोलण्याने नाती दूरावतील. क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांशी मतभेदाची शक्यता आहे. आवक मनाजोगती असली तरीही बचतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे.

मीन : शुभ रंग:केशरी, शुभ अंक : ५

मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल. क्षुल्लक गोष्ट फार मनाला लावून घेऊ नका. जशास तसे या धोरणाने वागा. आज तुमची तब्येत काहीशी नरमच असेल.