BIG NEWS : महाराष्ट्रातील या जिल्ह्यात ओमायक्रॉन JN1 (Omicron corona Variant Jn1)चा शिरकाव, पुरुषाला लागण; जिल्हास्तरावर खबरदारी घेण्याच्या सूचना

मुंबई : कोरोनाच्या नव्या व्हेरिंएटने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. देशभरात नव्या रुग्णांची संख्या वाढत असताना इकडे महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या जेएन1 सब-व्हेरिएंटने (Omicron corona Variant Jn1) शिरकाव केला आहे. सिंधुदुर्गातील 41 वर्षीय पुरुषाला corona Variant Jn1 ची लागण झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Massive Accident In Bengaluru : महामार्गावर धुक्यांमुळे अपघात, अनेक कार एकमेकांवर आदळल्या; (Watch Video)

नव्या व्हेरिएंटच्या शिरकावानंतर जिल्हास्तरावर खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. इन्फुएन्झा आणि सारीचे सर्व्हेक्षण अधिक सक्षम करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. सोबतच, कोव्हिड चाचण्या वाढवण्यासंदर्भात देखील आदेश दिल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

BIG NEWS | मुलांच्या शाळांची वेळ बदलली, आता या वेळेत भरणार शाळा

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय का? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. त्याचं कारण म्हणजे मागील काही दिवसांत राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. रुग्णांची संख्या जरी मोठी नसली तरी नव्या व्हेरीयंटचा (JN1 Varient) अनेकांनी धसका घेतल्याचं दिसत आहे.

महापालिका नोकर भरती : पात्र ३८८ उमेदवारांसाठी आमदार लांडगे सरसावले; अधिवेशनात मुद्दा मांडणार : महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन

केरळात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. त्याचप्रमाणे राज्यात सध्या 45 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातच आज एकूण 14 रुग्णांचे निदान झाले आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे जेएन1 हा नव्याने आलेला व्हेरीयंट असल्याचं बोललं जात आहे. यासंबंधी केंद्राकडून राज्यातील आरोग्य मंत्र्यांची बैठक घेण्यात आली असून घाबरण्याचं कारण नसलं तरी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात सध्या 45 सक्रिय रुग्ण : केरळमध्ये बुधवार 19 डिसेंबर रोजी 292 रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच 3 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्याचबरोबर राज्यात सध्या 45 सक्रिय रुग्ण आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या बैठकीत राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नागरिकांना देखील काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.