हल्ली उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे. या उन्हाळ्याच्या दिवसात फळांचा राजा म्हणजेच आंबा आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो. आंबा म्हटलं की आपल्या लगेच तोंडाला पाणी सुटते.
गोड ‘आंबट चवीने उपयुक्त असा आंबा प्रत्येकाच्या मनाला भुरळ पाडत असतो परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका आंब्याबद्दल सांगणार आहोत त्याची किंमत आणि त्याचे वजन आणि त्याचे नाव जाणून तुम्ही स्वतः थक्क व्हाल..
ऐन उन्हाळ्याच्या दिवसात देखील पाऊस पडल्याने यावेळी आंब्याचा जोर तसा कमीच आहे, अशावेळी जे आंबे आहेत त्यांचा भाव देखील गगनाला भिडलेले आहे. इतक्या सगळ्यातच एका अडीच किलोच्या आंब्याची चर्चा मात्र सगळीकडे रंगत आहे. हा अडीच किलोचा आंबा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेला आहे.
अवकाळी पाऊस पडल्यामुळे हापूस आंब्याचे उत्पादन कमी झालेले पाहायला मिळते. या सर्व परिस्थितीमुळे आंब्याचा भाव वाढलेला आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी फळ बाजारामध्ये देखील आंबे कमी आलेले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील एक आंबा मात्र या सीजनमध्ये भाव खाऊन जात आहे. हा आंबा एकंदरीत अडीच किलोचा आहे. हा आंबा पाहण्यासाठी लोकांची चांगलीच गर्दी जमत आहे. अनेक प्रयोग करून या शेतकऱ्याने हा आंबा उगवलेला आहे.
हा आंबा जरी अडीच किलोचा असला तरी दिसायला मात्र अगदी नारळासारखा आहे. त्या आंब्याचे नाव चक्क “शरद पवार” असे ठेवण्यात आलेले आहे.
दूरवर या आंब्याच्या नावाची चर्चा देखील केली जात आहे. हे नाव ठेवण्यामागे कारण देखील तसेच आहे, एकेकाळी शरद पवार कृषी मंत्री होते. कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना अंमलात आणल्या होत्या. या योजनेचा त्याकाळी शेतकऱ्यांना मोठा लाभ देखील झाला. याचे भान ठेवून सोलापुरातील या शेतकऱ्याने या आंब्याला शरद पवार असे नाव दिले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात दत्तात्रय घाडगे या शेतकऱ्याचे नाव आहे. दत्तात्रय यांनी वेगवेगळे प्रयोग करून हा आंबा विकसित केलेला आहे. भविष्यात देखील वेगवेगळे प्रयोग करून आंब्याच्या वेगवेगळ्या जाती प्रजाती विकसित करण्याचा शेतकरी दत्तात्रय यांचा मानस आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये भरण्यात आलेल्या आंबा महोत्सवामध्ये या आंब्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली. हा आंबा प्रति किलो सव्वा दोनशे रुपये विकला जात आहे.
माढा हा एक दुष्काळी भाग असून देखील शेतकऱ्यांनी केलेला प्रयोग हा कौतुक करण्यासारखा आहे. दत्तात्रय यांनी केलेल्या या प्रयोगामुळे भविष्यात शेतकऱ्यांना नक्कीच मदत होईल, अशी आशा देखील केली जात आहे.
झेरॉक्सचं दुकान दाखवतो म्हणत प्रवाशासोबत भयानक कांड; नागरिकांमध्ये दहशत, वाचा नेमकं काय घडलं?
आंबा विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या झाडांवरील कलम करून विविध प्रकारचे आंबे घेण्यात आले तसेच होमिओपॅथीचे विविध औषध यांचा उपयोग करण्यात आलेला आहे. या शेतकऱ्याने आपल्या आठ एकर जमिनीमध्ये 7000 पेक्षा जास्त केशर आंब्याची लागवड केली आहे.