देशातील आघाडीचा स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही ब्रँड शाओमी इंडियाने आज ऑप्टिमस इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (ओईएल ) सोबत भागीदारीची घोषणा करत आपला ‘मेक इन इंडिया’ प्रवास मजबूत करत आहे. हे सहकार्य वायरलेस ऑडिओ उत्पादनांच्या स्थानिकीकरणासह सुरू होणार्या AIoT डोमेनमधील एका मोठ्या उपक्रमाचे प्रतीक आहे . या भागीदारीद्वारे, शाओमी ने नोएडा येथे असलेल्या ओईएल कारखान्यात स्थानिक पातळीवर उत्पादित केलेल्या पहिल्या ऑडिओ प्रॉडक्ट उत्पादन सुरू केले.
या विभागातील देशांतर्गत चॅम्पियन्ससह ऑपरेशन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग पार्टनरशिपच्या विस्ताराद्वारे, शाओमी ने आर्थिक विकासाला चालना देत आणि रोजगाराच्या संधी निर्माण करताना भारताप्रती आपली वचनबद्धता मजबूत केली आहे. कंपनी पुढील दोन वर्षांत स्मार्टफोनच्या देशांतर्गत मूल्यवर्धनात 50% वाढ करण्याचे लक्ष्य ठेवत आहे.
हे सहकार्य उच्च-गुणवत्तेच्या उत्पादनांचे उत्पादन करण्यासाठी, भारतातील देशांतर्गत उत्पादनाच्या वाढीस हातभार लावण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्याच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी शाओमी चे समर्पण प्रदर्शित करते.
मुरलीकृष्णन बी, अध्यक्ष, शाओमी इंडिया म्हणाले, “ऑप्टिमस इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबतची ही भागीदारी प्रामाणिक किमतीत ‘मेड इन इंडिया’ असणारी उच्च- गुणवत्तेची उपकरणे आणण्यासाठी उत्पादनांचे आणि घटकांचे स्थानिकीकरण वाढवण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे . आम्ही आमच्या उत्पादन लाइन-अपमध्ये विस्तृत श्रेणीसाठी असे आणखी सहकार्य करण्यासाठी वचनबद्ध आहोत .”
सहयोगावर भाष्य करताना, ऑप्टिमस इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे संचालक, नितेश गुप्ता म्हणाले, “ आम्ही शाओमी इंडियासोबत भागीदारी करताना आणि त्यांच्या स्थानिकीकरणाच्या दृष्टीकोनात योगदान देताना आनंदी आहोत. शाओमी ही भारतीय इलेक्ट्रॉनिक्स इकोसिस्टममधील अग्रगण्य प्लेयर पैकी एक आहे आणि ती त्याच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासाठी ओळखली जाते, त्यामुळे ही भागीदारी ऑप्टिमस इलेक्ट्रॉनिक्सच्या कौशल्याची आणि वाढत्या क्षमतेची महत्त्वपूर्ण साक्ष आहे. आम्ही शाओमी उत्पादने तयार करण्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधांद्वारे उत्कृष्ट मूल्य प्रदान करण्यास उत्सुक आहोत.”
प्रत्येकासाठी जिवंत नावीन्य आणण्यावर लक्ष केंद्रित करून, नवीन भागीदारी अंतर्गत शाओमी इंडिया ने भारतीय बाजारपेठेत प्रामाणिक किंमतींवर प्रगत तंत्रज्ञान आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील एक प्रमुख प्लेयर म्हणून आपले स्थान आणखी मजबूत करणे हे आहे .