सर्वात प्रथम वडापाव कोणी बनवला; जाणून घ्या यामागील रंजक गोष्ट

93
vada-pav

वडापाव एक असा खाद्यपदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतो. महाराष्ट्रातील लोकांचं आणि वडापावच नातं काही औरच आहे.

कारण फक्त पंधरा रुपयात पोटाची खळगी भरणारा आणि जिभेचे चोचले पुरवणारा हा वडापाव महाराष्ट्रातील सर्वच छोट्या-मोठ्या शहरांमध्ये पाहायला मिळतो.

पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का? की ह्या वडापावचा अविष्कार कसा झाला ? वडापाव सर्वात प्रथम कोणी बनवला?

असं म्हटलं जातं की 55 वर्षांपूर्वी वडापावचा शोध मायानगरी मुंबईत लागला. सन 1966 मध्ये मुंबईच्याच एका व्यक्तीने सर्वात प्रथम वडापाव बनवला होता. त्यांचं नाव आहे अशोक वैद्य.

पुण्यातल्या हिंजवडीच्या चौकातील तो प्रयोग यशस्वी, कसा होणार फायदा वाचा

असं म्हटलं जातं की अशोक वैद्य मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनच्या बाहेर हातगाडीवर वडापाव विकत होते. या वडापावला त्या रस्त्यावरून जाणारे लोक आणि विशेषतः कापड गिरण्यांमधील कामगार खूपच पसंत करत होते.

गौतमी पाटीलची घनश्याम दरोडेला गुगली; म्हणाली, की मी इतकंच म्हणेन…

परंतु जेव्हा मुंबईच्या कापड गिरण्या बंद झाल्या तेव्हा त्यात काम करणारे कर्मचारी आपापल्या गावी परतले आणि कमाईचे साधन म्हणून त्या कर्मचाऱ्यांनी आपापल्या शहरात वडापाव विकायला सुरुवात केली.

त्यामुळेच मुंबईत विकला जाणारा वडापाव सर्वत्र मिळायला लागला.