काही दिवसांपूर्वीच जेनिफर मिस्त्री बंसीवालनं निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. आता अभिनेत्री मोनिका भदोरियानं असित मोदी विरोधात आरोपांची तोफ डागली आहे.
मोनिका भदोरियानं म्हटलं आहे की असित मोदी स्वतःला देव समजतात आणि सेटवर सतत गुंडागर्दी करतात,आगाऊपणाची भाषा बोलतात.
मोनिका भदोरिया ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये बावरी ही भूमिका साकारत होती. पण वाद झाला अन् तिनं २०१९ मध्ये मालिका सोडली. मेकर्सवर तिचे ४ ते ५ लाख रुपये शिल्लक आहेत. अखेर मोनिका भदोरिया कोण आहे? चला जाणून घेऊया तिच्याविषयी.
मोनिका भदोरिया एक टी.व्ही अभिनेत्री आहे, जिला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये बावरी या व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्धी मिळाली होती. या शो मधील तिचा ‘हाए,हाए,गलती से मिस्टेक हो गई..’ हा डायलॉग खूप हिट झाला होता.
मोनिका भदोरिया ग्वाल्हेर मध्यप्रदेशची राहणारी आहे आणि ती अभिनयाच्या क्षेत्रात करियर बनवायला मुंबईत आली होती.
मोनिका भदोरियानं ग्लॅमर इंडस्ट्रीत मॉडेलिंगच्या माध्यमातून पदार्पण केलं आणि २०१० मध्ये मुंबईत आली कारण तिला टी.व्ही आणि सिनेमात काम करायचं होतं.
मोनिकाला भले तारक मेहता मालिकेमुळे प्रसिद्धि मिळाली,पण तिनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं ते २०११ मध्ये टी.व्ही शो ‘ये रिश्ता क्या कहलाती है’ मालिकेतून केलं होतं.
यानंतर ती ‘इस प्यार को क्या नाम दू?’आणि ‘सजदा तेरे प्यार मे..’ सारख्या मालिकेत दिसली, यानंतर मोनिका भदोरियानं २०१३ मध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये ‘बाघा की प्रेमिका’ म्हणजे बावरी ही व्यक्तिरेखा साकारली होती.
तुम्ही हे जाणून कदाचित हैराण व्हाल की मोनिका भदौरियानं ‘सिंघम रिटर्न्स’ मध्ये देखील काम केलं होतं. या सिनेमात ती अजय देवगण आणि करीना कपूरसोबत दिसली होती.
मोनिकानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की करीनानं कशा पद्धतीनं ‘सिंघम रिटर्न्स’ शूटिंगच्या दरम्यान तिची मदत केली होती.
मोनिका भदोरियानं सांगितलं होतं की जेव्हा ती टीमसोबत हैदराबादला ‘सिंघम रिटर्न्स’ शूटिंगसाठी जात होती तेव्हा तिला या गोष्टीची चिंता सतावत होती की तिची फ्लाइट सूटेल. कारण शूटिंगचं पॅकअप ११ वाजता होणार होतं पण ते खूप उशिरापर्यंत सुरू राहिलं.
याच टेन्शनमध्ये मोनिका परफेक्ट शॉट देऊ शकली नाही आणि रोहित शेट्टीनं तिला दोन टेक करायला लावले. तेव्हा करीनानं तिला समजावलं की बाकी सगळं टेन्शन सोडून शॉटवर लक्ष दे आणि काम एन्जॉय कर,कारण तिनं स्वतः अनेकदा फ्लाइट मिस केली आहे.
BIG BREAKING NEWS : सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या; ठाकरे गटातला वाद चव्हाट्यावर WATCH VIDEO
मोनिका भदोरिया सध्या शूटिंगपासून दूर आहे,पण सोशल मीडियावर ती खूपच सक्रिय पहायला मिळते. मोनिका भदोरिया इन्स्टाग्रामवर आपले ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. टी.व्ही व्यतिरिक्त मोनिका भदोरिया थिएटरमध्ये देखील सक्रिय पहायला मिळते.