#WhatsApp : एका क्लिकवर जगाशी संवाद साधण्याची किमया करणाऱ्या WhatsApp ने पुन्हा एकदा क्रांतिकारी फीचर लाँच करताना आपले वेगळेपण पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. मेटा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी हे फीचर लाँच करताना आपल्या ग्राहकांना आपण सातत्याने नवीन काही तरी देत असल्याचे सांगितले.
WhatsApp या सोशल नेटवर्किंग ॲपच्या माध्यमातून आपण सर्वच जण एकमेकांशी संवाद साधतो. त्यामुळे हे ॲप साधारण ८० टक्क्यांपेक्षा जास्त मोबाईल वापरकर्त्याच्या मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे एकमेकांशी संवाद साधणे सोपे झाले आहे. यामध्ये अनेकदा अनेक खाजगी गोष्टी देखील बऱ्याचदा व्यक्त किंवा शेयर केल्या जातात. याचा अनेकांना तोटा देखील झाला आहे. जेवढे फायदेशीर हे ॲप आहे, त्यातुलनेत यांच्या चुकीचा वापर केल्यास यातून धोके देखील आहेत.
आपले एकमेकांतील संवाद सुरक्षित राहावेत, यासाठी WhatsApp च्या वतीने पर्सनल चॅट्स सुरक्षित करण्यासाठी ‘Chat Lock’ हे नवीन फीचर उपलब्ध करून दिले आहे. मेटाचे सीईओ मार्क झकरबर्ग यांनी ही माहिती आपल्या फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे..
PUNE NEWS: पुण्यात अधिकाऱ्याची मुजोरी, लाथ मारून उडवला स्टॉल; पाहा धक्कादायक VIDEO
साधारण अनेक वापरकर्ते आपल्या पासवर्ड किंवा थंबलॉक लावून माहिती सुरक्षित करतात. या फीचर मध्ये देखील एक पासवर्ड लावून तुम्हाला WhatsApp मधील चॅट्स सुरक्षित करता येणार आहे. ज्या चॅट्सना तुम्ही हे फीचर वापरणार, त्या चॅट्सचे नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणार नाहीत. मात्र ते चॅट्स वाचण्यासाठी तुम्हाला पासवर्डचा वापर करावा त्यानंतरच तुम्हाला ते चॅट्स वाचता येवू शकतील.
तुम्हाला YOUTUBE वरील ADS चा त्रास होतो? अशा प्रकारे करा ब्लॉक; काही मिनिटांत होईल सुटका
कंपनी काही दिवसांनी या फीचरमध्ये देखील काही अपडेट्स आणू शकते. हे फिचर लोकांची प्रायव्हसी आणखी सुरक्षित करण्यासाठी रोलआऊट करण्यात आले आहे. तसेच हे फिचर iOS आणि Android या दोन्ही वापरकर्त्यांसाठी सुरु करण्यात आले आहे.
PUNE NEWS : पुण्यात तुफान हाणामारी…कारण ऐकाल तर तुम्हीही चक्रावाल