विरोधकांना सांगुन निवडणुकीच्या दिवशी पैंज लावून २५०० च्या पुढे लीड घेतले
लोणी काळभोर (पुणे प्रहार-सचिन सुंबे)
नुकत्याच झालेल्या कदमवाक वस्ती ग्रामपंचायत मध्ये चित्तरंजन गायकवाड यांच्या नवपरिवर्तन पँनलने १६ जागा व सरपंच पदाची निवडणूक जिंकून जनसेवा पॅनलचा धुव्वा उडवला जनसेवा पॅनलचा फक्त एक उमेदवार निवडून आला.
मतदानाच्या दिवशी चित्तरंजन गायकवाड सरपंचपदाचे दावेदार असल्यामुळे कदमवाकवस्तीचे माजी उपसरपंच ऋषिकेश काळभोर यांनी दहा लाखाची पैंज लावली होती.
यावेळी चित्तरंजन गायकवाड यांनी सांगितले की मी जर २४९९मताच्या खाली जर लिड घेतले तर मी तुम्हांला दहा लाख रुपये देणार तर ऋषिकेश काळभोर यांनी चित्तरंजन गायकवाड यांना सांगितले की २५०० च्या वर मताचे लीड आले तर ऋषिकेश काळभोर हे चित्तरंजन गायकवाड यांना दहा लाख रुपये देणार.
अशा पद्धतीने मतदानाच्या दिवशी पैंज लागली होती .मतमोजणीच्या दिवशी सरपंचपदाचे उमेदवार चित्तरंजन गायकवाड हे २५२० मतांनी लिड घेऊन निवडुन आले .आता पुर्व हवेलीत त्या पैंजेची चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत पुणे प्रहारशी बोलताना चित्तरंजन गायकवाड यांनी सांगितले की पैंजेचा आलेला पैसा मी कदमवाकवस्ती येथील गोर गरिब जनतेच्या दवाखान्यासाठी वापरणार आहे.