उत्तर-पश्चिम दिल्लीच्या शाहबाद डेअरीमध्ये एका गजबजलेल्या रस्त्यावर कथित प्रेयसीला निर्दयीपणे चाकूने भोसकून ठार मारल्याबद्दल 20 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली होती.
आता नवीन सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी हल्ल्याच्या काही वेळ आधीच याठिकाणी उभा राहून पीडितेची वाट पाहत असल्याचं दिसून आलं आहे.
साहिलने 16 वर्षीय पीडितेवर 20 पेक्षा जास्त वेळा वार करून रविवारी तिची हत्या केली. तिच्या शरीरावर 34 जखमांच्या खुणा होत्या आणि तिची कवटी फुटली होती, असं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे.
आता सोशल मीडियावर व्हायरल झालेलं नुकतंच समोर आलेलं सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज दाखवतंय, की साहिल एका व्यक्तीशी संभाषणात गुंतलेला आहे आणि नंतर याच ठिकाणी त्याने पीडितेची हत्या केली. व्हिडिओमध्ये दिसतं की आरोपी साहिल एका व्यक्तीशी काही काळ संभाषण करतो. साहिल त्या ठिकाणी या अल्पवयीन मुलीची वाट पाहत होता, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
पीडितेचा खून करण्यापूर्वी आरोपीनी दारूचं सेवन केलं होतं. पोलिसांनी जप्त केलेल्या आणखी एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये, गुन्ह्याच्या काही मिनिटांपूर्वी साहिल एका व्यक्तीशी बोलत होता. चौकशीदरम्यान, साहिल सरफराज खानने या भीषण हत्येची कबुली दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गुन्ह्यात वापरलेला चाकू हत्येच्या 15 दिवसांपूर्वी हरिद्वार येथून खरेदी केला होता. हत्येनंतर, उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे आपल्या मावशीच्या घरी पळून जाताना रिठाला मेट्रो स्टेशनकडे जात असताना त्याने गुप्ता कॉलनीजवळील झुडपात चाकू फेकल्याचा दावा केला.
अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, मुलीने काही दिवसांपूर्वी साहिलशी बोलणे बंद केले होते आणि घटनेच्या आदल्या दिवशी त्याच्याशी वाद झाला होता. त्यांनी उघड केलं की मुलगी 2021 पासून साहिलसोबत रिलेशनशिपमध्ये होती, परंतु त्यांच्यात वारंवार वाद होत होते. अखेरीस, तिने त्याच्याशी संपर्क तोडण्याचा निर्णय घेतला आणि संबंध पूर्णपणे संपवण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र साहिलने तिच्याशी पॅचअप करण्याचा प्रयत्न केला, असं अधिकाऱ्याने सांगितलं.