या मराठमोळ्या अभिनेत्रींनी घटस्फोटानंतर केली नवीन सुरुवात,आज जगतायेत अगदी आनंदात !

80
अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टी मध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांचे घटस्फोट झालेले आहेत. या अभिनेता व अभिनेत्री ची जोडी एकेकाळी टेलिव्हिजन विश्वात प्रसिद्ध होती. मालिकेमध्ये काम करत असतानाच एकमेकांवर जीव जडला आणि मैत्रीचे रूपांतर नंतर लग्नात झाले परंतु या मराठी अभिनेत्रींचे संसार मात्र जास्त दिवस चालले नाहीत.

काही दिवसातच त्यांनी घटस्फोट घेतला परंतु घटस्फोट घेतल्यानंतरही त्यांनी आपल्या जीवनाची नवीन सुरुवात केली आणि आजच्या क्षणाला या सगळ्या अभिनेत्री अगदी आनंदाने व मुक्तपणे आपले उर्वरित जीवन जगत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मराठमोळ्या घटस्फोटीत अभिनेत्रींबद्दल माहिती सांगणार आहोत.

अभिनेत्री तेजस्विनी पंडित

अभिनेत्री तेजस्विनी पंडित आपल्या सर्वांना माहिती आहे. तेजस्विनी पंडित ने 16 डिसेंबर 2012 रोजी बिझनेस मॅन भूषण भोपचेशी लग्न केले होते आणि काही वर्षातच ते दोघे वेगळे देखील झाले असे असून देखील आज अभिनेत्री तेजस्विनी पंडित चित्रपटसृष्टी मध्ये आपली वेगळी झलक दाखवताना दिसते.

अभिनेत्री सई ताम्हणकर

अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्याला वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका करताना दिसते. तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सई आणि अमेय गोसावीने 2013 मध्ये लग्न केले होते लग्नाच्या दोन वर्षातच या दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.

अभिनेत्री पल्लवी पाटील

पल्लवी पाटीलने संग्राम समेळ सोबत 2016 मध्ये लग्न केले पण या दोघांच्या नात्यांमध्ये फारसा काही गोडवा नव्हता. छोट्या छोट्या गोष्टीवरून यांच्यात वाद व्हायचे. एके दिवशी या दोघांनी वेगळे राहण्याचे निर्णय घेतला. संग्राम ने मात्र 2021 मध्ये दुसरे लग्न केले.

अभिनेत्री मयुरी वाघ

अभिनेत्री मयुरी वाघ देखील 2017 मध्ये सोबत लग्न केले. हे मयुरीचे पहिले आणि पियुष्य दुसरे लग्न होते. काही काळ संसार केल्यानंतर आता मात्र मयुरी पासून वेगळी राहते. सध्या मयुरी अविवाहित आहे.

अभिनेत्री स्नेहा वाघ

तुम्हा सर्वांना बिग बॉस फिल्म स्नेहा वाघ माहीतच असेल. स्नेहा ने अगदी कमी वयातच म्हणजे 19 व्या वर्षी लग्न केले होते त्यानंतर तिला कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागले. स्नेहाच्या पहिल्या पतीचे नाव अविष्कार दार्वेकर होते. 2015 साली अनुराग सोळंकी सोबत स्नेहाने दुसरे लग्न केले. अनुराग इंटरनेट डिजाइनर आहे परंतु हे लग्न ही फक्त आठ महिने टिकले.

अभिनेत्री मानसी नाईक

प्रसिद्ध नृत्यांगना अभिनेत्री मानसी नाईकने सुद्धा एकेकाळी सर्वच्या हृदयावर राज्य केले होते. मानसीने प्रदीप खरेरा सोबत जानेवारी 21 मध्ये लग्न केले होते. एका वर्षाच्या आतच हे दोघे वेगळे झाले. आता मानसी अविवाहित असून स्वतःचे जीवन अगदी आनंदाने जगत आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधान

अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांची सुप्रसिद्ध जोडी आपल्या सर्वांना माहितीच आहे. या दोघांनी “होणार सुन मी या घरची” या मालिकेत एकत्रितरित्या कामही केली होती.

ही जोडी प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडली होती त्यानंतर तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांनी 2014 मध्ये लग्न केले. लग्न केल्यानंतर सहा महिन्यातच या दोघांनी घटस्फोट देखील केला व 2015 मध्ये हे दोघे वेगळे झाले, तेव्हापासून तेजश्री अविवाहित आहे आणि मात्र दुसरे लग्न केले आहे.