सर्वात गरीब देश म्हणून “या” देशांची झाली नोंद गरिबी, दारिद्रय पहाल तर डोळ्यातून येतील अश्रू !

94

आपल्या आजूबाजूला असे अनेक देश आहेत, जे विकासाच्या मार्गावर आहेत. काही देश प्रगती करत आहेत. काही देश मात्र खूपच गरीब आहेत. या देशांमध्ये गरिबीचे प्रमाण इतक्या वाढलेले आहे की लोकांची परिस्थिती पाहून, ऐकून, जाणून तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी येईल आणि म्हणूनच हा देश जगातील गरीब देशांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आलेला आहे.

हा देश इतका गरीब आहे की या देशातील लोकांना काम मिळत नाही त्याचबरोबर एका वेळेचे खाणे देखील मिळणे मुश्किल झालेले आहे म्हणूनच हा देश जगातील सर्वात गरीब देश ठरलेला आहे. या देशाचे नाव आहे बुरुंडी. हा देश पूर्व आफ्रिकेत आहे. या देशावर अमेरिका आणि ब्रिटन या दोघांची सत्ता आहे.

या देशाबद्दल बोलायचे झाल्यास 1996 मध्ये हा देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर या देशात जातीय संघर्ष देखील सुरू झाला, यामुळे या देशाचे अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली. या अवस्थेमुळे आजही लोक खूपच गरीब आहे. गरिबी या देशाचा पाठलाग काही सोडत नाही.

या देशाचे एकंदरीत लोकसंख्या 12 दशलक्ष म्हणजेच एक कोटी २० लाख इतकी आहे, त्यातील 85 टक्के लोकांना गरीब देखील म्हणता येणार नाही. हे लोक अगदी दारिद्र्याच्या रेषेखाली आहे.

आज आपण वेगवेगळ्या तंत्रज्ञान संशोधनाच्या गोष्टी करत असलो तरी या देशांमध्ये मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नाहीत, त्याचबरोबर 1996 ते 2005 या काळादरम्यान या देशात मोठ्या प्रमाणावर वांशिक संघर्षाने लोकांचा बळी घेतला होता. हळूहळू देश हा आर्थिक दृष्ट्या मागास होऊ लागला आणि त्यानंतर सर्वात गरीब देश म्हणून या देशाची नोंद घेतलेली आहे.

बुरुंडीशिवाय मादागास्कर, सोमालिया आणि मध्य आफ्रिकन रिपब्लिकसह अनेक देश गरिबीशी झुंज देत आहेत.

या देशातील लोकांचे वार्षिक उत्पन्न बद्दल बोलायचे झाल्यास, 180 डॉलर म्हणजे वर्षाला 14 हजार रुपये इतके आहे. येथे तीन लोकांपैकी एक व्यक्ती हा बेरोजगार आहे तसेच काही लोक असे देखील आहेत ज्यांना दिवसभर मेहनत करून देखील पन्नास रुपये मिळवता येत नाही. यूएन आणि इतर संस्था जगभरातील अनेक गरीब देशांकरिता अनेक मोहिमा राबवत आहे परंतु या देशाची परिस्थिती अद्याप काही सुधारली नाहीये.