वाळूज येथील तोडफोडीशी मराठा आंदोलकांचा संबंध नाही

278

औरंगाबाद – वाळूज औद्योगिक वसाहतीत नऊ ऑगस्टला झालेल्या तोडफोडीशी मराठा आंदोलकांचा संबंध नसल्याचे तपासातून समोर येत आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. ‘मराठा समाजाचे आंदोलन सामाजिक होते. ते अशा हिंसक घटनेत सहभागी होतील, अशी शक्‍यता कमीच आहे. तोडफोडीचे कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचे होते. त्याकडे याचदृष्टीने पोलिस बघत आहेत. सीसीटीव्ही फुटेज पाहून व सखोल तपास करूनच आरोपींना अटक केली जात आहे,” असे ते म्हणाले. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 53 जणांना अटक केली आहे.