जपान : प्रधानमंत्री मोदींच्या पाया पडले ‘या’ देशाचे प्रधानमंत्री, मोदीही झाले भावुक !

52

जपानमधील जी-7 परिषदेत सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता जपानमधून रवाना झाले आहेत.

सध्या नरेंद्र मोदी जपान सोडून हिंद पॅसिफिक महासागरातील छोटा देश पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले आहेत.पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पापुआ न्यू गिनी येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेतले. जेम्स मारापे यांनी नरेंद्र मोदी यांच्या चक्क पाया पडल्या.

हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पंतप्रधानांचा हा दौरा खूप महत्वाचा आहे कारण पापुआ न्यू गिनी हा हिंद प्रशांत महासागरात स्थित एक बेट आहे आणि त्याच्या स्थानामुळे हिंद पॅसिफिक महासागराच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा दौरा खूप महत्वाचा आहे. तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले आहेत. यावेळी त्यांचे पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी स्वागत केले.

हेही वाचा : BIG BREAKING : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुणे जिल्ह्याचं विभाजन होणार? ‘या’ नावाने असणार नवीन जिल्हा?

यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या पाया पडल्या. पंतप्रधानांनी त्यांना मिठी मारून शुभेच्छा स्वीकारल्या. येथे ते फिपिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत.