पुणेकरांच्या प्रवासाला येईल आता वेग, या शहरापासून सुरू होतील विशेष एक्सप्रेस ट्रेन; एका क्लिकवर पहा संपूर्ण गाडीचा मार्ग

48

पुणेकरांच्या आनंदामध्ये भर पडेल अशी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आज तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत. हल्ली उन्हाळ्याचे दिवस आहे. उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येक जण प्रवास करतो.

हा प्रवास करत असताना आपण वाहन म्हणून जास्तीत जास्त वापर रेल्वेचा करत असतो. रेल्वेच्या माहितीने लांब लांब च्या टूर देखील काढल्या जातात. रेल्वेमुळे प्रवास सुकर आणि सोपा देखील होतो. पुणेकरांचा प्रवास अजून सोपा होण्याकरिता रेल्वेच्या विविध मार्गावर स्पेशल ट्रेन सुरू करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे.

पुणे ते इंदूर या स्थानका दरम्यान देखील लोकांची वाढती रेल चेल परिस्थितीचा अंदाज घेत या मार्गावर उन्हाळा विशेष गाडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

BIG BREAKING NEWS : देशात पुन्हा नोटाबंदी; हि नोट होणार बंद; नोटा बदलण्यासाठी ४ महिन्यांची मुदत

या विविध मार्गावर रेल्वे 14 आठवड्यांपर्यंत विशेष गाड्या सुरू करेल, परिणामी यामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा देखील मिळणार आहे. या विशेष ट्रेनमुळे रेल्वे अतिरिक्त प्रवास सुखाचा होणार आहे, अशी आशा देखील व्यक्त केली जात आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पुणे इंदूर उन्हाळी विशेष गाडी सुरू करण्यात येणार आहे. ही गाडी पुणे रेल्वे स्थानकातून फलाट क्रमांक पाच वरून इंदूरला रवाना होईल आणि रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी इंदूरला पोहोचेल तसेच इंदूर वरून ही गाडी 11 वाजता निघून सकाळी 3: 15 वाजता पुणे रेल्वे स्थानकावर येईल.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही गाडी लोणावळा कल्याण, वलसाड, सुई, वडोदरा, वलसाड, वडोदरा, रतलाम, नागदा रोड, उज्जैन, देवास या रेल्वे स्थानकांवर थांबेल.

उन्हाळ्याच्या दिवसात पुणे इंदोर या मार्गाने अनेक विद्यार्थी प्रवास करत असतात तसेच मुलांना विद्यार्थ्यांना सुट्टी लागल्याने या गाडीचा प्रवास देखील वाढलेला आहे याचे भान राखूनच प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

प्रशासनाने सुरू केलेल्या या विशेष गाड्यांमुळे उन्हाळ्याच्या दिवसात सहन कराव्या लागणाऱ्या अडचणींचा ओझा आता कमी होईल अशी आशा देखील व्यक्त केली जात आहे.