आता पिंपरी चिंचवडच्या नामांतराची मागणी, कोणी केली मागणी; काय असेल नवीन नाव? जाणून घ्या आत्ताच…!

50

काही दिवसापूर्वीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सगळीकडे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याचबरोबर चौंडी येथे देखील कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलेले होते.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते त्यानंतर आता पिंपरी चिंचवडच्या नामांतराची मागणी जोर धरत आहे. भविष्यात पिंपरी चिंचवडचे नेमके नाव काय असेल? याची देखील उत्सुकता अनेकांना लागली आहे.

गेल्या अनेक दिवसापासून शहरांच्या नामांतराला वेग आलेला आहे. औरंगाबाद आणि अहमदनगरचे नाव देखील बदलण्यात आलेले आहे. यानंतर पिंपरी चिंचवड या शहरांचे नाव बदलावे अशी मागणी करण्यात आलेली आहे.

जर औरंगाबाद आणि नगर चे नाव बदल सरकार करू शकते तर मग पिंपरी चिंचवडचे का नाही? असा सवाल अनेक संघटनांनी केलेला आहे, त्यामुळे पिंपरी चिंचवड नाव बदलण्यासही निर्णय सरकार घेईल का? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या जोरावर शहराच्या नामांतरांचा निर्णय घेणे सरकारला भारी पडेल की काय असे देखील अनेकांना वाटत आहे.

राज्यामध्ये विविध शहरांची नावे बदलण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होत आहेत अशातच पिंपरी चिंचवड शहराचे नाव देखील बदलावे अशी मागणी भक्ती शक्ती प्रतिष्ठान करून करण्यात आलेली आहे.

मारुती इर्टिंगा आणि स्प्लेंडरची समोरासमोर धडक, फोटो पाहून हादरले लोक

या प्रतिष्ठानने शहरांमध्ये फ्लेक्स लावत अशी मागणी देखील केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 वा राज्याभिषेक दिनाचे निमित्त साधून या सर्व गोष्टी घडवल्या जात आहेत तसेच भविष्यात पिंपरी चिंचवडचे नाव “जिजाऊ नगर” करावे असे मागणीचे फ्लेक्स देखील लावण्यात येत आहे. या फ्लेक्समुळे शहरात सगळीकडे चर्चेला वेग आलेला आहे.