महामार्गावरील पुल रस्ता खचला, वारज्यात झाली वाहतूक कोंडी; भडकले प्रवाशी !

14

शहरातील अनेक ठिकाणी महामार्गाचे काम वेगाने चालू आहे. महामार्ग शहराची प्रगती करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्या ज्या ठिकाणी महामार्ग तयार झालेले आहेत जेथे वाहतूक कोंडी दूर झालेली आहे परंतु अनेकदा अशी काही परिस्थिती निर्माण होते ज्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागतो.

खडकवासला येथील वारजे येथे महामार्गावरील पुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या खाली मातीचा भराव खचला. सोमवारी घडलेल्या या घटनेमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. प्रवाशांना दोन ते तीन तास या ठिकाणी अडकून राहावे लागले.

warje pul

वारजे येथे साताऱ्याच्या बाजूला जाणाऱ्या महामार्गावरील पुलाचे काम सुरू आहे परंतु हे काम सुरू असतानाच पूलाच्या खाली मातीचा ढिगारा खचला आणि येथे ही घटना घडली. नवीन पूलाचे काम सुरू असल्याने या ठिकाणी फक्त दोन ते तीन लेन सुरू होत्या. आता या ठिकाणी मातीचा ढिगारा खचल्याने फक्त एक ते दीड पदरी असलेला रस्ता सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे दीड किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या.

ही रांग डुक्कर खिंडीपर्यंत पोहोचलेली होती. या सर्व परिस्थितीला हाताळताना वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ आले होते. नेहमी साताऱ्याकडे जाण्यासाठी या मार्गावर लोकांची गर्दी पाहायला मिळते. संध्याकाळी ही गर्दी मोठ्या प्रमाणावर असते.