पुणे : सॅनी इंडिया या बांधकाम साहित्याच्या आघाडीच्या उत्पादक कंपनीने ओम हायड्रॉलिक्स इक्विपमेंट्ससोबत सहयोगाने महाराष्ट्रातील पुणे येथे त्यांच्या नवीन ४एस कार्यालयाच्या उद्घाटनाची घोषणा केली आहे. हा पुढाकार प्रदेशातील सॅनी इंडियाची उपस्थिती अधिक दृढ करतो आणि ग्राहकांना उच्च दर्जाचे बांधकाम साहित्य व सर्वोत्तम ग्राहक सेवा देण्याप्रती त्यांची कटिबद्धता दर्शवतो.
पुण्यातील हे केंद्र सॅनीसाठी प्रदेशातील एकमेव डिलरशिप कार्यालय असेल, ज्यामुळे ते कंपनीच्या प्रदेशातील कार्यसंचालनांसाठी महत्त्वपूर्ण हब आहे आणि ग्राहकांना विक्री, सेवा, स्पेअर पार्टस् व मशिन्सच्या कौशल्य विकासासाठी एक-थांबा सोल्यूशन देतो. मुख्य कार्यालय महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना सेवा देईल, जसे पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, कोल्हापूर, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि सोलापूर.
सॅनी इंडिया ॲण्ड साऊथ एशियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दीपक गर्ग यांच्यासह सॅनी इंडियाचे कार्यकारी संचालक श्री. डॉसन झू, सॅनी हेवी इंडस्ट्री इंडिया प्रा. लि. चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सेल्स, मार्केटिंग ॲण्ड कस्टमर सपोर्ट) श्री. धीरज पांडा आणि ओम हायड्रॉलिक्स इक्विपमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक विजय साळुंखे यांनी उद्घाटनावेळी प्रदेशातील ग्राहकांचे स्वागत केले. डिलरशिप क्षेत्रातील अनेक संभाव्य ग्राहकांना सेवा देईल. हे नवीन केंद्र कंपनीच्या भावी स्केलेबिलिटी योजना सुधारण्यास मदत करेल.
याप्रसंगी सॅनी इंडिया ॲण्ड साऊथ एशियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दीपक गर्ग म्हणाले, ‘‘ओम हायड्रॉलिक्स इक्विपमेंट्सोबतचा आमचा सहयोग दृढ करत नवीन केंद्रामधून आमच्या क्लायण्ट्सना उच्च दर्जाची उत्पादने व अपवादात्मक सेवा प्रदान करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. या विभागामध्ये नवोन्मेष्कारी असणे महत्त्वाचे आहे आणि पुण्यातील नवीन ४एस कार्यालयाचे लाँच यासंदर्भात महत्त्वाचे पाऊल आहे. आम्ही प्रदेशातील आमची पोहोच विस्तारित करण्यासोबत स्केलेबिलिटी पर्याय वाढवण्याकरिता नाविन्यता आणत राहू.’’
ओम हायड्रॉलिक्स इक्विपमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय साळुंखे म्हणाले, ‘‘नवीन अत्याधुनिक केंद्र सॅनीची अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त सर्वोत्तम उत्पादने सादर करेल. सॅनी इंडियासोबतचा आमचा सहयोग आम्हाला आमचा व्यवसाय विकसित करण्यास आणि ग्राहकांना सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यास मदत करेल.’’