रविवार ४ जून : आजचे राशीभविष्य, कसा असेल आजचा तुमचा दिवस तुमच्या राशीसाठी जाणून घ्या

32

जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

मानसिक गोंधळ सावरावा लागेल. आवडते पुस्तक वाचायला मिळेल. इतरांना उदारपणे मदत कराल. गोडीने सर्वांना आपले मत पट‍वून द्याल. आर्थिक चिंता दूर होईल.

mesh

वृषभ:-

स्वत:चे स्वत्व राखण्याचा प्रयत्न कराल. बोलण्यातून आत्मविश्वास दाखवाल. मनातील इच्छा हवी तशी पूर्ण होईल. प्रत्येक गोष्टीचा उत्तम प्रकारे आनंद घ्याल. काही कामे क्षुल्लक कारणास्तव रखडली जातील.

vrushab

मिथुन:-

जलद गतीने कामे पूर्ण कराल. क्षुल्लक कारणास्तव येणारी निराशा दूर सारावी. प्रतिकूलतेतून वेळेवर मार्ग निघेल. किरकोळ अडचणीमुळे खट्टू होऊ नका. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.

mithun

कर्क:-

तुमच्या धार्मिकतेत वाढ होईल. जामीनकीचे व्यवहार तूर्तास टाळा. खोटे बोलण्याने नुकसान संभवते. रहस्यमय गोष्टी जाणून घ्याव्याशा वाटतील. कागदपत्रांची नीट तपासणी करून पुढे जावे.

karaka

सिंह:-

आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी खटपट कराल. कामे पूर्ण करण्यासाठी दिवसभर झटाल. हातातील अधिकार वापरण्याची संधी मिळेल. मानसिक चंचलता जाणवेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात.

siha

कन्या:-

जोडीदाराच्या प्रेम सौख्यात वाढ होईल. भागीदारीच्या व्यवसायात उत्कृष्ट लाभ मिळेल. कामानिमित्त दिवसभर बाहेर राहाल. व्यावहारिक चातुर्य दाखवावे लागेल. पुढील परिस्थितीचा योग्य अंदाज बांधण्याचा प्रयत्न करावा.

kanya

तूळ:-

केलेल्या कामातून समाधान मिळेल. क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका. ठामपणे निर्णय घेणे गरजेचे आहे. कामातील शिस्त मोडून चालणार नाही. प्रवासाची आवड पूर्ण होईल.

tul

वृश्चिक:-

रेस, जुगारातून धनलाभ संभवतो. अती विचाराने ताण येईल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव राहील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

vruchik

धनू:-

व्यापारातून चांगला नफा संभवतो. पत्नीची व्यवहारकुशलता दिसून येईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. कामात वडीलधार्‍यांचे सहकार्य लाभेल. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा.

dhanu

मकर:-

तुमच्या विषयीचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा. जुन्या गोष्टी उकरून काढत बसून नका. सकारात्मक विचारसरणीतून मार्गक्रमण करावे. कफ विकाराचा त्रास संभवतो. अविचाराने निर्णय घेऊ नका.

makar

कुंभ:-

मुलांशी गप्पागोष्टी करण्यात रमून जाल. कामे अधिक जोमात पार पाडाल. चटकन येणार्‍या रागावर आवर घालावा. पुढील काळासाठी उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवा. आवडते पदार्थ खायला मिळतील.

kumbha

मीन:-

मुलांवरील खर्च वाढू शकतो. जवळचे नातेवाईक गोळा होतील. मनाची द्विधावस्था टाळावी लागेल. वादाच्या मुद्द्यापासून चार हात दूर रहा. वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल.

min