सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये यकृत आणि मूत्रपिंडाचे यशस्वीरित्या प्रत्यारोपण

53

पुणे : पश्चिम भारतातील रुग्णालयांची सर्वात मोठी शृंखला असलेल्या सह्याद्रि हॉस्पिटल्सने डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वीपणे पूर्ण करून आणखी एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. यकृत आणि बहु-अवयव प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. बिपीन विभूते आणि सिनियर कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ. अतुल सजगुरे यांच्या नेतृत्वाखालील या अवयवदानाद्वारे केल्या जाणाऱ्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया तज्ञ वैद्यकीय पथकांनी केल्या.

यकृत प्रत्यारोपणात ५७ वर्षीय प्राप्तकर्त्याचा समावेश होताजो लिव्हर सिरोसिसने ग्रस्त होता. तर सबड्युरल हिमॅटोमामुळे दुर्दैवाने ब्रेन डेथ (Brain Deathझालेला एक ४९ वर्षीय मृत हा अवयव दाता होता. मात्र ही एक अतिशय आव्हानात्मक अशी शस्त्रक्रिया ठरली कारण एक धातूचा स्टेंट यकृताच्या मुख्य रक्तवाहिनीमध्ये होता आणि थेट हृदयापर्यंत पोहोचला होता. डॉ. बिपिन विभूते यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने १० तासांच्या शस्त्रक्रियेत या आव्हानांवर यशस्वीपणे मात केली. कोणत्याही संभाव्य रक्तस्त्राव समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि सुयोग्य पोस्ट-ऑपरेटिव्ह काळजी घेण्यासाठी अवयव प्राप्तकर्ता हा सध्या निरीक्षणाखाली आहे.

अवयवदानाच्या निःस्वार्थी कृत्यामुळे असंख्य जीवनात आशा निर्माण झाली आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणातगेल्या ५ वर्षांपासून डायलिसीस घेत असलेल्या ५७ वर्षीय प्राप्तकर्त्याला एक नवे आयुष्य मिळाले आहे. डॉ. अतुल सजगुरे आणि त्यांच्या टीमने मूत्रपिंड प्रत्यारोपण केले. प्राप्तकर्ता आता दर तासाला 800-900 मिली लघवी पास करून मूत्रपिंडाच्या कार्याची सकारात्मक चिन्हे दर्शवित आहे. प्राप्तकर्त्याच्या आरोग्यातील ही लक्षणीय सुधारणा अवयवदानाचे महत्त्व आणि मूत्रपिंड च्या आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी त्याचा काय परिणाम होऊ शकतो यावर प्रकाश टाकते.

यकृत प्रत्यारोपणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे सह्याद्रि रुग्णालयातील यकृत आणि बहु-अवयव प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. बिपीन विभुते यांनी यशस्वी प्रक्रियेबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, “आमचे प्राथमिक लक्ष हे कायमच आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी देण्यावर असते. आजच्या या यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेने एक अनोखे आव्हान सादर केलेज्यासाठी सूक्ष्म नियोजन आणि अंमलबजावणीची आवश्यकता होती. १० तासां इतका विस्तृत कालावधी लागणाऱ्या बहु-अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यात गुंतलेली जटिलता आणि अचूकता अधोरेखित करतात. या शस्त्रक्रिया करताना आमच्या टीमने दाखवलेले अपवादात्मक वैद्यकीय कौशल्य आणि अतूट समर्पण याबद्दल मी खरोखरच कृतज्ञ आहे. अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी ते फार महत्त्वपूर्ण असते.” 

सह्याद्रि हॉस्पिटल्सचे सिनियर कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ. अतुल सजगुरेज्यांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाचे नेतृत्व केलेत्यांनी अवयव दानाची अत्यंत महत्त्वाची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले, “हे मूत्रपिंड प्रत्यारोपण केवळ प्राप्तकर्त्याला दुसरी संधीच देत नाही तर जगभरात अवयव दान करण्याच्या गरजेचे महत्व सांगते. जनजागृती करणे आणि अधिकाधिक व्यक्तींना अवयव दाता होण्यासाठी प्रोत्साहित करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ऐच्छिक अवयव दान करण्याच्या फॉर्मवर स्वाक्षरी करूनआपण खूप मोठा बदल घडवू शकतो आणि असंख्य जीव वाचवू शकतो.”

सह्याद्रि हॉस्पिटल हे उत्तम नगरशिवणेपुणे येथे राहणाऱ्या ४९ वर्षीय उदार अवयवदात्याचे आभार मानते. त्यांच्या निःस्वार्थ कृत्याने प्राप्तकर्त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी अनुकूल बदल झाला आहे. या अवयवदात्याचे एक मूत्रपिंड आणि यकृत सह्याद्रि रुग्णालयात प्रत्यारोपण करण्यात आलेतर दुसरे मूत्रपिंड शहरातील दुसऱ्या एका रुग्णालयात पाठवण्यात आले.

सह्याद्रि हॉस्पिटल अपवादात्मक वैद्यकीय सेवा देण्यासाठीअवयवदानाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण उपचारांद्वारे रुग्णांचे जीवन सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्यासाठी नेहमीच वचनबद्ध राहील.

हे हि वाचा : पीडितेची फुटलेली कवटी, 34 जखमा अन् नवं CCTV फुटेज, दिल्ली हत्या प्रकरणातील आतापर्यंतचे अपडेट