पुण्यातील विद्यार्थ्यांनी ऑलिम्पियाड अवॉर्ड्स २०२२-२३मध्ये घवघवीत यश मिळवले

38

पुणे: पुण्यातील तीन विद्यार्थ्यांनी २०२२-२३च्या एसओएफ ऑलिम्पियाड परीक्षेत इंटरनॅशनल रँक मिळवले आहेत. संस्कृती स्कूल, भुकूम कॅम्पसच्या प्रथित व्ही उपाध्यायने नॅशनल सायन्स ऑलिम्पियाडमध्ये रँक १ मिळवून आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक व प्रमाणपत्र पटकावले आहे. श्री स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कुलच्या नाकवे एन हितेश या इयत्ता नववीतील विद्यार्थ्याने इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलिम्पियाड रँक १, रुपये ५०,०००, आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक आणि मेरिट प्रमाणपत्र तर एस एन बी पी इंटरनॅशनल स्कूलच्या सहावी इयत्तेमधील तनय टी वैष्णव या विद्यार्थ्याने इंटरनॅशनल सोशल स्टडीज ऑलिम्पियाड रँक-१, ५०,००० रुपये आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक आणि मेरिट प्रमाणपत्र मिळवले आहे.

२०२२-२३ च्या एसओएफ ऑलिम्पियाड परीक्षेत ७० देशांमधील जवळपास ६० लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. एकट्या पुण्यातून २.८५ लाखांहून जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. संस्कृती स्कूल, युरो स्कूल यासारख्या शाळांचे विद्यार्थी यामध्ये होते.

२०२२-२३ शैक्षणिक वर्षातील ऑलिम्पियाड परीक्षेतील विजेते, शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचा सत्कार करून त्यांना पारितोषिके देण्यासाठी सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनने दिल्लीमध्ये एका पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. सात ऑलिम्पियाड परीक्षेत सहभागी झालेल्या इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या पहिल्या तीन एसओएफ वर्ल्डवाईड रँक विजेत्यांचा या समारोहात सत्कार करण्यात आला. भारताचे माननीय माजी मुख्य न्यायाधीश श्री दीपक मिश्रा हे यावेळी उपस्थित होते.

या समारोहात आंतरराष्ट्रीय रँक-१ मिळवणाऱ्या ६६ विजेत्यांना ५०,००० रुपये, आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक आणि एक मेरिट प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. आंतरराष्ट्रीय रँक-२ मिळवणाऱ्या ६६ विजेत्यांना २५,००० रुपये, आंतरराष्ट्रीय रजत पदक आणि एक मेरिट प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. आंतरराष्ट्रीय रँक-३ मिळवणाऱ्या ६६ विजेत्यांना १०,००० रुपये, आंतरराष्ट्रीय कांस्य पदक आणि एक मेरिट प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. सहभागी झालेल्या ७० देशांमधून ज्यांच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्वल यश मिळवले अशा अव्वल २५ मुख्याध्यापक, ६० इन्स्ट्रक्टर्स यांचा देखील रोख पारितोषिके, स्मृतिचिन्हे व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.