BIG NEWS | ठाकरे गटाला मोठा धक्का; काँग्रेस, राष्ट्रवादी…

539
uddhav-thackeray.jpeg

जिल्ह्यात दाहा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणुका होत आहेत. त्यामध्ये खमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा देखील समावेश आहे. या बाजार समितीमध्ये वर्षाकाठी तब्बल अडीच हजार कोटी रुपयांची उलाढला होते.

बाजार समितीच्या निवडणुकीवरून सध्या खामगावमध्ये चांगलचं राजकारण तापलं आहे.  काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने राष्ट्रवादीला सोबत घेत आपल्या 18 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

मात्र या 18 उमेदवारांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकही जागा देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे मविआत फूट पडल्याचं या निवडणुकीच्या निमित्तानं समोर आलं आहे.

18 पैकी एकही जागा न मिळाल्यानं आता शिवसेना ठाकरे गटाने नाराज असलेल्या राष्ट्रवादीच्या एका गटाला सोबत घेऊन वेगळी चूल मांडली आहे. काँग्रेसने या निवडणुकीत महाविकास आघाडी असा शब्द वापरू नये असंही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

खामगाव बाजार समितीमध्ये ठाकरे गट शिवसेनेला एकही जागा मिळालेली नाहीये. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सर्व 18 जागांवर आपलेच उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे मविआत फूट पडल्याचं समोर आलं आहे. दुसरीकडे शिवसेनेने राष्ट्रवादीचा नाराज गट गळाला लावला आहे.

या फुटीचा फटका हा या निवडणुकीत मविआला बसणार का हे पहाण महत्त्वाचं ठरणार आहे.