एका बुक्कीत जावयाने सासूचे दोन दात पाडले, चेहऱ्यावर गरम पाणी टाकलं… पुण्यातील धक्कादायक घटना

113
hot-water-for-hair-feature-resize_202112735532

पुणे : जावयाने (Son in Law) सासुला (Mother in Law) मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात झालेल्या किरकोळ वादानंतर जावयाने सासूला मारहाण करत तिच्या चेहऱ्यावर गरम पाणी टाकलं.

इतकंच नाही तर तोंडावर बुक्की मारून सासूचे दोन दात देखील पाडले. खडकी पोलीस स्टेशनच्या (Khadki Police Station) हद्दीतील आर्मी कॉर्टरमध्ये हा प्रकार घडला. खडकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जावई महेंद्र सिद्धनाथ तोरणे (वय 25) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासू सुजाता कैलास शिंदे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. आरोपी महेंद्र हा सुजाता शिंदे यांचा जावई असून तो त्यांच्याच घरात राहात होता.

घटनेच्या दिवशी सासू सुजाता शिंदे यांनी जावई महेंद्राला घरातून दुसरीकडे राहाण्यास जा असं सांगितलं. सासू घरातून हाकलून देत असल्याने जावई प्रचंड संतापला. त्याने सासूच्या चेहऱ्यावर गरम पाणी टाकलं.

हेही वाचा :वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलला बोलावणे पडले महागात, कासारवाडीतील बर्थडे बॉयवर गुन्हा दाखल

इतकंच नाही तर तिच्या चेहऱ्यावर बुक्की मारली. यात सासू सुजाता शिंदे यांचे दोन दात पडले. सुजाता शिंदे यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मागील अनेक वर्षांपासून सुजाता शिंदे, त्यांची मुलगी आणि जावई तिघेही खडकी परिसरात राहत होते. सासू, मुलगी आणि जावई एकाच घरात राहत असल्यानं घरात सतत काहीना काही कुरबुरी सुरू असायच्या.

हेही वाचा : पुण्याचा विकास : आठपदरी मार्गावर 17 उड्डाणपूल, 5 बोगदे ! पहा पीएमआरडीए रिंगरोडचा “मेगा प्लॅन’…

मात्र अनेकदा सासूनं या सगळ्याकडे लक्ष दिलं नाही. त्यातच वाद वाढत गेले आणि सासूनं थेट जावयाला घराबाहेर निघून जाण्यास सांगितलं. याचा जावयाला राग आला आणि त्यानं थेट गरम पाणी सासूवर ओतलं. जावयाला अटक केला असून आज न्यायालयात हजर करण्यात आलं आहे.

दरम्यान, पुणे शहरातील (Pune) खराडी बायपास इथं एका बुलेट स्वाराने कार चालकाच्या डोक्यात आरसा मारल्यामुळे जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत कार चालक सुनील ओमप्रकाश राणा यांनी विमानतळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा : पुण्याचा विकास : आठपदरी मार्गावर 17 उड्डाणपूल, 5 बोगदे ! पहा पीएमआरडीए रिंगरोडचा “मेगा प्लॅन’…

तक्रादार सुनील राणा खराडी बायपास मार्गे चिंबळी फाटा इथं कामानिमत्त जात होतो. जनक दर्गा इथं सिग्नल असल्याने सुनील यांनी कार थांबवली. कारच्या समोर एक बुलेटस्वार होता, ज्यावर एक मुलगा आणि मुलगी बसले होते, ते बुलेट सारखी मागे-पुढे करत असल्याने सुनील यांनी कारचा हॉर्न वाजला.

हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने बुलेटवर मागे बसलेल्या मुलीने सुनील यांना शिव्या दिल्या. याचा जाब विचारला असता मुलाने कार थांबवून सुनील यांना बाहेर काढलं आणि त्यांना मारहाण सुरु केली. यातल्या मुलाने बुलेटचा आरसा काढऊन तो सुनील यांच्या डोक्यात मारला. यात सुनील राणा हे गंभीर जखमी झाले.