सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये केंद्र सरकार एका योजनेअंतर्गत सर्व नागरिकांना मोफत स्मार्टफोन देणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
‘सरकारी व्लॉग’ हे यूट्यूब चॅनल आहे, त्याच्या एका व्हिडिओमध्ये केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री स्मार्टफोन योजना 2023’ ही नवी योजना चालवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार सर्वांना मोफत स्मार्टफोन देत आहे.
आता पीआयबीने या संदेशाची सत्यता तपासली असता, तो पूर्णपणे दिशाभूल करणारा आणि खोटा असल्याचे आढळून आले आहे. पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये दावा केला आहे की, हा व्हिडीओ खोटा असून हा फसवणुकीचा प्रयत्न आहे.
अनेक वेळा अशा व्हिडिओंसोबत काही लिंक्सही शेअर केल्या जातात व त्याद्वारे तुमची वैयक्तिक माहिती या लिंक्सवर मागवली आहे.
त्या लिंकवर क्लिक करताच तुमची वैयक्तिक माहिती हॅकर्सकडे जाते. यामुळे तुमचे बँक खाते हॅक होऊ शकते किंवा अशी वैयक्तिक माहितीही अनेक वेळा सार्वजनिक डोमेनमध्ये जाते, जी तुमच्यासाठी योग्य नाही.
⚠️Fraud Alert
'Sarkari Vlog' नामक #YouTube चैनल के एक वीडियो में यह दावा किया गया है कि ‘प्रधानमंत्री स्मार्टफोन योजना 2023’ के तहत केंद्र सरकार सभी को फ्री में स्मार्टफोन उपलब्ध करवा रही है#PIBFactCheck
▶️ यह वीडियो #फ़र्ज़ी है
▶️ यह धोखाधड़ी का प्रयास है, कृपया सावधान रहें pic.twitter.com/SbhXUp4q1c
— PIB Fact Check (@PIBFactCheck) April 18, 2023