Video : धक्कादायक : पुण्यातल्या पोलीसांना ‘राजकीय हात’ लागतोच कशाला? पुण्यात पोलीसांचे चाललंय काय? अल्पवयीन मुलांना पोलीसांकडुन जबर मारहाण; कुटुंबीयांना शिवीगाळ तसेच उर्मट भाषा वापरल्याची माहिती

172
Now take money from the police in Pune; 5 thousand to 10 thousand can be earned; Find out what is the case

पोलीसांनीच कायद्यात रहायची गरज…!

लोणी काळभोर : लोणी काळभोर येथे घरासमोर शांततेत वाढदिवस साजरा करत असताना लोणी काळभोर पोलिसांनी अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण करण्याची धक्कादायक घटना घडली असून या पोलिसांच्या विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करावा व आम्हाला न्याय द्यावा अशी मागण अर्ज शिवसेनेचे पदाधिकारी संतोष बाबुराव भोसले यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला केला आहे.

PUNE NEWS: पुण्यात अधिकाऱ्याची मुजोरी, लाथ मारून उडवला स्टॉल; पाहा धक्कादायक VIDEO

याबाबत घडलेली घटना अशी की मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याची सुमारास संतोष भोसले यांचा वाढदिवसानिमित्त त्यांचे पुतणे शिवराज भोसले व त्यांचे मित्र यांच्या समावेत भोसले चाळीच्या समोर केक कापत असताना अचानक त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे व त्यांचे सहकारी आले कोणाला कसलीही कल्पना नसताना त्यांनी अचानक लाठीमार करायला सुरुवात केली व तेथील नागरिक व महिलांना शिवीगाळ करून संतोष भोसले सहकार्‍यांना फरपटत नेण्याचा प्रयत्न केला.

तुम्हाला YOUTUBE वरील ADS चा त्रास होतो? अशा प्रकारे करा ब्लॉक; काही मिनिटांत होईल सुटका

त्यालाठी चार्जमध्ये शिवराज भोसले वय वर्षे 17याच्या पाठीवर गंभीर दुखापत झाली असून झाली आहे .याबाबत वैभव मोरे व त्यांच्या सहकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संतोष भोसले यांनी केली आहे.

BIG CHANGE IN WHATSAPP : व्हाट्सअँपमध्ये होणार मोठा बदल; काय आहे व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन वैशिष्ट्ये जाणून घ्या?

पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे यांचा लोणी काळभोर येथे आल्यापासून कार्यकाळ कायमच वादग्रस्त राहिला असून न केलेल्या गुन्ह्यात मुलांना अडकवण्यासाठी त्यांचा हातखंडा असल्याचे नागरिकात चर्चा सुरू आहे.

PUNE NEWS : पुण्यात तुफान हाणामारी…कारण ऐकाल तर तुम्हीही चक्रावाल

प्रत्येक महापुरुषांच्या जयंती निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीत वैभव मोरे यांनी लाठीचार्ज केल्याची चर्चा आता नागरिक करु लागले आहे. त्यामुळे या अधिकार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

झेरॉक्सचं दुकान दाखवतो म्हणत प्रवाशासोबत भयानक कांड; नागरिकांमध्ये दहशत, वाचा नेमकं काय घडलं?

रस्त्यावर वाढदिवस साजरा करताना कायदेशीर कारवाई करण्यास आमचा विरोध नव्हता पण एका राजकीय पुढार्‍याच्या फोनवरून वैभव मोरे व त्यांच्या सहकार्‍यांनी अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण केल्याचा आरोप संतोष भोसले व नागरिकांनी केला आहे.

https://fb.watch/kAJZmBP1s4/?mibextid=NnVzG8