धक्कादायक! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिकलठाणा परिसरातील एक धक्कादायक बातमी समोर अली आहे. जन्मदात्या बापाने कौटुंबिक वादातून पोटच्या मुलांनाच विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत मोठ्या मुलाला वाचवण्यात यश आले. मात्र, सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. राजू प्रकाश भोसले (३५) असे याप्रकरणी अटक केलेल्या पित्याचे नाव आहे.
वृत्तसंस्थाच्या माहीती नुसार, राजू प्रकाश भोसले हा कुटुंबीयांसह चौधरी कॉलनीमध्ये राहतात. राजू यांचे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्याना दोन मुले,आहे. नशेच्या अहेरी गेलेल्या राजुचे पत्नीसोबत कौटुंबिक वाद सुरू झाले.त्याचा वागण्याला पत्नी कंटाळली होती. त्यातून काही दिवसांपूर्वी त्यांच्यात झालेल्या वादानंतर पत्नी दोन्ही मुलांना घेऊन नांदेड येथील माहेरी निघून गेली होती.
नशेमुळे विक्षिप्त झालेल्या राजूने सासर गाठत मुलांना आणले. शुक्रवारी वडील सोबत पुन्हा वाद घातला. नशेत धुंद असलेला राजू दोन्ही चिमुकल्यांना उचलून पडला. रात्री आठच्या सुमारास घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीजवळ जाऊन मोठमोठ्याने ओरडत त्याने दोन्ही मुलांना विहिरीत फेकून दिले.
शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत मोठ्या मुलाला वाचवण्यात स्थानिकांना यश आले. मात्र 7 वर्षांच्या चिमुकल्याचा या घटनेत मृत्यू झाला. राजू प्रकाश भोसले (३५) असे याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.