Sharad Mohol : संदीप मोहोळच्या हत्येनंतर शरद मोहोळने वैकुंठातच घेतली होती ‘अशी’ शपथ; तपासात अनेक गोष्टी उघड

By: Editor_Pratik

On: Monday, January 8, 2024 5:00 AM

Sharad-Mohol-Munna-Kolekar-Namde
Google News
Follow Us

पुणे : ‘मामाच्या वादाचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळचा (Sharad Mohol) खून केला,’ हा आरोपींचा दावा पटणारा नसल्याने पुणे पोलिसांनी या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यासाठी कंबर कसली आहे. मोहोळच्या खुनाचा कट नियोजनबद्ध रचला असून, या पाठीमागे बडी धेंडं असल्याचा पोलिसांचा कयास आहे.

Sharad Mohol : तेव्हापासून आरोपी धुमसतच होते… शरद मोहोळ हत्याप्रकरणातील सर्वात धक्कादायक माहिती उघड

‘मुख्य आरोपी मुन्ना पोळेकरने दहा वर्षांपूर्वी मामासोबत झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळच्या खुनाचा मारल्याचा प्लॅन आखला,’ असे आरोपींनी पोलिसांच्या चौकशीत सांगितले. मात्र, आरोपींकडून मांडण्यात येणारी ‘थिअरी’ पोलिसांच्या पचनी पडत नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे पोलिसांकडून सर्व शक्यतांची पडताळणी करण्यात येत आहे.

तरुणाचा खासगी भाग महिलेने कापला; चौकशी सुरू; पहा Video

मुळशीतील एका कुख्यात गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. त्याने शनिवारी पोलिस आयुक्तालयात हजेरी लावली. सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांनी त्याची चौकशी केली असून, आज, सोमवारी त्याला पुन्हा गुन्हे शाखेत हजेरी लावण्यास बजावले आहे. हा गुन्हेगार सध्या राजकीय पक्षाशी संबंधित असून, त्याच्या आणि शरद मोहोळ गटात काही महिन्यांपूर्वी वादही झाला होता.

मोठी बातमी : ऑनलाइन गर्लफ्रेंड स्कीमचा पर्दाफाश; राज्य हादरलं

संदीप मोहोळच्या हत्येनंतर शरद मोहोळने वैकुंठातच मारणे टोळी संपविण्याची शपथ घेतली होती. त्यानंतर मारणे टोळीतील किशोर मारणेला नीलायम टॉकिजजवळील प्लॅटिनम हॉटेलमध्ये संपवण्यात आले. मारणे टोळीशिवाय अन्य काही व्यक्ती मोहोळ टोळीच्या ‘रडार’वर होत्या, असे बोलले जाते. त्यातूनच मोहोळचा ‘गेम’ करण्यात आला का, ही शक्यता आजमावून पाहात आहेत.

Trending News Today : बॉयफ्रेंडला रात्री घरी बोलवायची, शंका येऊ नये म्हणून आई-वडिलांना द्यायची झोपेच्या गोळ्या, 3 महिन्यांनंतर…

शरद मोहोळच्या पत्नीने भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला होता. त्यांना महिला आघाडीचे पदही देण्यात आले होते. शरद मोहोळने हिंदूरक्षक, गोरक्षक म्हणूनही स्वत:ची प्रतिमा उंचावली होती. त्यातूनच त्याची राजकारणातील महत्त्वाकांक्षा वाढल्याचे दिसून येत होते. आगामी महापालिका निवडणुकीत पत्नीला नगरसेवक करायचे, अशी इच्छाही मोहोळने प्रगट केली होती. त्याची वाढती महत्त्वाकांक्षा काहींसाठी अडचणीची ठरली असती. त्यातून कोणी पाऊल उचलले आहे का, याचीही चौकशी करण्यात येत आहे.

Brother want Marry Sister : बहिणीशीच लग्न करण्याचा भावाचा बालहट्ट, विरोध केल्याने उचललं भयानक पाऊल

शरद मोहोळच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर त्याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ‘हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करून न्याय द्यावा,’ अशी मागणीही त्यांनी फडणवीसांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्वाती मोहोळ भाजप पुणे शहर महिला आघाडीच्या सरचिटणीस आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी एप्रिल २०२३मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Sharad mohol murder case : शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी वकिल ढसाढसा रडले, कारण…

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 21, 2026

March 21, 2026

March 20, 2026

March 20, 2026

March 20, 2026

March 20, 2026