SANY इंडियाच्या क्रॉलर क्रेन्सचे 8 युनिट्स संघवी मूव्हर्स लिमिटेडला पोहोचते करण्‍यात आले

21

पुणे, २८ ऑगस्ट २०२३: बांधकामासाठी लागणाऱ्या उपकरणांची निर्मिती करणारी अग्रगण्य कंपनी सेनी इंडिया (SANY India) ने भारतातील काही सर्वात मोठ्या क्रॉलर क्रेन्सपैकी एक असलेल्या (750 टन) SANY SCC7500A चे 8 युनिट्स संघवी मूव्हर्स लिमिटेड (SML) कंपनीला पोहोचते करत एक लक्षणीय टप्पा गाठला आहे. SANY SCC7500A 750 टन क्लॉलर क्रेन्सचे 8 युनिट्स पोहोचते झाल्याने आता SMLच्या मालकीच्या या क्रेन्सची संख्या दहा झाली आहे. सेनी क्रेन्सच्या जगभरातील कोणत्याही कंपन्यांकडे असलेल्या ताफ्याहून हा सर्वात मोठा ताफा आहे.

या क्रेन्स पोहोचत्या झाल्याने विविध क्षेत्रांतील प्रमुख पायाभूत प्रकल्पांसाठी भाड्याने उपलब्ध उपाययोजना म्हणून 45 SANY क्रॉलर क्रेन्स, ट्रक क्रेन्स आणि ऑल-रेन ट्रेन्स बाळगणाऱ्या SMLचे भारतातील सर्वात मोठी हॉइस्टिंग सोल्यूशन्स कंपनी म्हणून असलेले स्थान अधिक भक्कम झाले आहे.

या प्रसंगी बोलताना SANY इंडिया आणि साऊथ एशियाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. दीपक गर्ग म्हणाले, “संघवी असोसिएशनबरोबरचे आमचे प्रदीर्घ काळापासूनचे संबंध आहेत. याआधी 2022 मध्ये आम्ही SCC8000A या जगातील सर्वात मोठ्या क्रॉलर क्रेन्स संघवी मूव्हर्स लिमिटेडला पोहोचत्या केल्या आणि आता 750 टनांच्या SANY SCC7500A क्रॉलर ट्रेन्सचे 8 युनिट्स पोहोचते केल्याने हे नाते अधिकच दृढ झाले आहे. यातून आमच्या सर्व ग्राहकांना जागतिक दर्जाची उत्पादने आणि सेवा पुरविण्याप्रती आमच्या कटिबद्धतेवर नव्याने शिक्कामोर्तब झाले आहे. या सहयोगाला वेगवेगळ्या बांधकामाच्या जागांमध्ये समोर येणाऱ्या आव्हानात्मक स्थितीमध्येही सुरक्षा, विश्वासार्हता आणि टिकाऊपणाची हमी देणारी सर्वोत्तम दर्जाची उपकरणे पुरविण्यास आम्ही बांधील आहोत. आम्ही हे नाते जपत आलो आहोत आणि येत्या वर्षांमध्ये ही भागीदारी आणखी भक्कम होईल, अशी आम्हाला आशा आहे.”

संघवी मूव्हर्स लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. ऋषी संघवी म्हणाले, “संघवी मूव्हर्सला भक्कम पाठिंबा दिल्याबद्दल आणि विश्वास दाखविल्याबद्दल आम्ही SANY इंडियाचे खूप आभारी आहोत.34 वर्षांचा कार्यकाल असलेला संघवी मूव्हर्स हा भारताच्या काही सर्वात विश्वासू ब्रॅण्ड्सपैकी एक आहे. संघवी मूव्हर्सच्या दृष्टीने विश्वासार्हता, खात्रीशीरपणा, टिकाऊपणा आणि सुरक्षा या सर्वाधिक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या नव्या क्रॉलर क्रेन्समुळे आम्ही अगदी सर्वात खडतर परिस्थितीतही आपली सर्वोत्तम कामगिरी करून दाखवू आणि आमच्या ग्राहकांच्या विविध प्रकारच्या मागण्या पूर्ण करू.

SANY इंडियाबरोबरचे आमचे दीर्घकाळ जपलेले नाते म्हणजे नव्या संकल्पनांना चालना देण्याप्रती व आपल्या उद्योगक्षेत्रामध्ये नवे मापदंड निर्माण करण्याप्रती आमच्या सामायिक समर्पणभावनेचे प्रतीक आहे. एकत्रितपणे आम्ही भारताच्या पायाभूत विकासाला बळ देण्याप्रती आणि देशाच्या विकासात आपले योगदान देण्याप्रती आपली दृढ बांधिलकी राखून आहोत.”

SCC7500A ही एक 750 टन लिफ्टिंग क्षमता असलेली क्रॉलर क्रेन आहे, जी पवन ऊर्जा आणि बिगर-पवन ऊर्जा उपयोजनांमध्ये (उदा. सिमेंट क्षेत्र, पेट्रो-मिक्ल्स आणि रिफाइनरी, स्टील प्लान्ट्स आणि ऊर्जानिर्मिती केंद्रे) सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आली आहेत, ज्यांच्या बूमची कमाल लांबी 108 मीटर्स आहे व कमाल लफिंग जिब एकत्रितपणे 96 मीटर्स + 96 मीटर्स इतके आहे.

SANY इंडियाच्या क्रॉलर क्रेन्स सर्वप्रकारच्या परिस्थितीमध्ये काम करण्यासाठी तांत्रिक नवसंकल्पना, कमाल सुरक्षा, सुस्थिरता आणि लवचिकता यांसह सर्वोत्तम विश्वासार्हता आणि सर्वोच्च कार्यान्वयन क्षमता देऊ करतात. SCC7500A कडे 10,000 टन-मीटर्सची कमाल लिफ्टिंग मोमेन्ट आहे व ही क्रेन 447 kW/ 1800rpm रेटेड पॉवर असलेल्या अत्यंत शक्तिशाली आणि कार्यक्षम कमिन्स इंजिनने सुसज्ज आहे. ही क्रॉलर क्रेन उपयोजनेच्या गरजेनुसार विविध बूम प्रकारांशी जोडता येते. सध्या ही क्रेन जामनगर, गुजरात येथील पवन-ऊर्जा प्रकल्पामध्ये बसविण्यात आली आहे.