सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर यांच्याबरोबर रंगणार ‘कोण होणार करोडपती’चा खेळ

25

पुणे : जनसामान्यांचा लोकप्रिय  कार्यक्रम म्हणजे ‘कोण होणार करोडपती‘. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या  कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात ‘कोण होणा करोडपतीमध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात‘ चिरतरुण व्यक्तिमत्व सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर हॉट सीटवर येणार आहेत.

दीपस्तंभ फाउंडेशन या संस्थेसाठी सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर ‘कोण होणार करोडपतीचा खेळ खेळणार आहेत. या पर्वातील हा पहिला विशेष भाग असणार आहे. या भागात सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर यांच्याशी गप्पा रंगणार आहेत.  आणि या बापलेकीबरोबर  रंगणाऱ्या गप्पा आणि किस्से पाहणे हे प्रेक्षकांसाठी खास सणार आहे. त्याशिवाय ‘कोण होणार करोडपतीच्या मंचावर दोन सचिन एकत्र असतील. तेही नक्कीच गमतीदार असेल. कोण होणार करोडपतीच्या खेळाबरोबरच सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर यांचे मनोरंजक अनुभव जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका, ‘कोण होणार करोडपती‘ विशेष जून, शनिवारी रात्री 

 वाजताफक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर. 

चित्रपट सृष्टीत तब्बल ६० वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते सचिन पिळगांवकर

कोण होणार करोडपतीचा खेळ खेळणार आहेत.सचिन पिळगांवकर हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत प्रचं

लोकप्रिय अभिनेते. त्यांनी त्यांच्या अभिनयाचे ठसे त्यांच्या बालपणापासूनच उमटवले आहेत. तसेच श्रिया सुद्धा

मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीत नावलौकिक आघाडीची अभिनेत्री आहे. चित्रपटांसोबतच काही गाजलेल्या वेब

मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आजवर आली. श्रियाकडून आपल्या बाबांविषयीचे काही गमतीदार किस्से प्रेक्षकांना पाहायला/ऐकायला मिळणार आहेत.

सचिन खेडेकर यांच्याशी बोलताना अनेक गोष्टी उलगडल्या जाणार आहेत. सचिन पिळगांवकर म्हणाले की,त्यांच्याआजवरच्या कारकिर्दीत त्यांनी वकिलाची भूमिका कधीच केली नाही. पण श्रियाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात ही  वकिलाच्या भूमिकेपासूनच केली. सचिन पिळगांवकर मंचावर आहेत आणि गाणे सादर होणार नाहीहे शक्य नाही. कोण होणार करोडपतीच्या मंचावर त्यांनी श्रियाबरोबर गाणेही सादर केले आणि ‘कोण होणार करोडपतीचा मंच काही काळासाठी संगीतमय झाला.