‘प्रतिशोध’- झुंज अस्तित्वाची! मालिकेत नीना कुळकर्णी यांची एन्ट्री! सोम. ते शनि. रा. १० वा. सोनी मराठी वाहिनीवर.

39

सोनी मराठी वाहिनी  आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. आता ‘प्रतिशोध’ ही मालिका  प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. निरनिराळ्या चित्रपटांमधून आणि मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे अमोल बावडेकर हे ममता या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आले आहेत. प्रतिशोध ही आई आणि मुलगी यांच्या विशिष्ट नात्यावर भाष्य करणारी थरारक मालिका आहे.  तृतीयपंथी आई आणि दिशा नावाची मुलगी यांचं नातं आणि त्यांचा संघर्ष याची कहाणी या मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

मालिकेत आता एन्ट्री झाली आहे शर्मिष्ठा वर्धे यांची. शर्मिष्ठा वर्धे यांच्या भूमिकेत अभिनेत्री नीना कुळकर्णी पाहायला मिळताहेत . निरनिराळ्या मालिकांतून आपल्या भेटीस येणार्‍या अभिनेत्री नीना कुळकर्णी आता वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. शर्मिष्ठा वर्धे असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून त्यांच्या येण्याने दिशा आणि शंतनू यांच्या नात्यात काय अडचणी येणार, हे आता पाहण्यासारखं असेल. कारण शर्मिष्ठा वर्धे या शंतनूच्या आई आहेत. मालिकेत सुरुवातीपासून शंतनूची आई म्हणजे शर्मिष्ठा वर्दे यांचा उल्लेख आला आहे. शंतनूने वकिलीचा अभ्यासही आपल्या आईकडून प्रेरणा घेऊनच केला आहे. त्यांच्या येण्याने मालिकेत आता काय वेगळी वळणं येणार हे पाहण्याजोगं असेल.

भूतकाळाची सावली बदलणार भविष्याची दिशा. पाहायला विसरू नका ‘प्रतिशोध’- झुंज अस्तित्वाची. सोम. ते शनि. रा. १० वा. सोनी मराठी वाहिनीवर.