Big Breaking News : देशात पुन्हा नोटाबंदी; हि नोट होणार बंद; नोटा बदलण्यासाठी ४ महिन्यांची मुदत

163

आरबीआयने मोठी घोषणा केली आहे. २ हजारच्या नोटांची छपाई बंद होणार आहे. आरबीआयने आज याबाबत महत्वाची माहिती दिली. २ हजारच्या नोटा सध्या व्यवहारात सुरू राहणार.

निश्चिलिकरण नोव्हेंबर २०१६ मध्ये पाहायला मिळाले होते. त्यावेळी २ हजारच्या नोटा चलणात आल्या होत्या. २ हजारची नोट बदलाची असेल तर २३ मे पासून बदलू शकता , असे देखील आरबीआयने स्पष्ट केले. ३० सप्टेंबर पर्यंत नोटा बदलून घेण्याची मुदत राहणार आहे.

“भारतीय रिझर्व्ह बँकेच्या “स्वच्छ नोट धोरण” च्या अनुषंगाने २००० मूल्याच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २००० च्या नोटा कायदेशीर चलनात राहतील. सर्व बँकांनी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० च्या नोटांसाठी ठेव आणि/किंवा विनिमय सुविधा उपलब्ध करून द्यावी,” असे आरबीआयने म्हटले आहे.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १००० आणि ५०० ​​रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून कमी करण्याची घोषणा केली होती. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणे आणि काळ्या पैशाचा प्रवाह थांबवणे हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट होते. यानंतर २००० आणि ५०० च्या नवीन नोटा चलनात आणल्या होत्या.