पुणेकरांचा बस मार्ग बदलणार, यापुढे मार्केट यार्ड वरून मावळला जाणाऱ्या बसेस सुटतील कोथरूड डेपो तून!

71

सर्वसामान्य लोकांसाठी प्रवास करण्यासाठी हक्काची मानली जाणारी एसटी म्हणजेच लालपरी. या एसटीच्या माध्यमातून आपण शहराअंतर्गत प्रवास करत असतो तसेच एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी एसटीचा प्रवास करण्यासाठी आवश्यक असणारे तिकीट या सदर देखील कमी असते.

जर आपण शहारा बाबत बोलायचं झाल्यास प्रत्येक शहराची स्वतः बस संस्था कार्यरत असते. या बस सेवाच्या माध्यमातून आपण देखील करतो आणि म्हणूनच अनेकदा एसटी परवडत असते परंतु लवकरच पुणेकरांचा बस मार्ग बदलणार आहे यापुढे मार्केट यार्ड वरून मावळला जाण्यासाठी तुम्हाला कोथरूड डेपो गाठावा लागणार आहे. मावळला जाणाऱ्या सर्व बसेस आता कोथरूड डेपो मधून सुटतील.

पुणे शहरातील अत्यंत महत्त्वाचे स्थान मानले जाणारे मार्केट यार्ड येथे धान्य, फुले, फळे इत्यादी गोष्टी मिळतात म्हणूनच पी एम पी एल च्या मार्केट यार्ड मधून मावळला जाणाऱ्या बस सेवा एक जून पासून बंद होणार आहे. ही सेवा आता यापुढे कोथरूड डेपो येथून मिळेल. प्रवाशांना मावळला जाण्यासाठी आता यापुढे कोथरूड डेपो मध्ये जावे लागेल.

मार्केट यार्ड मधून मावळातील घोटावडे, खरवडे, लरावडे, माले, कातर खडक, पौंड, मारणे वाडी, कोळवन, या ठिकाणी जाण्याकरिता एकंदरीत 19 बस सेवा असून त्यातील 8 मुक्कामी असतात. रोज या मार्गाने 19 हजार पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात.

मार्केट यार्ड मधून स्वारगेट, डेक्कन, कोथरूड, चांदणी चौक मार्गे बस पुढे जातात. त्यामुळे शहरातून मावळकडे जाणाऱ्या बस सेवांची संख्या देखील जास्त आहे परंतु आता मार्केट यार्ड मधून बस सेवा बंद होणार असल्याने शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. शेतकऱ्यांचा प्रवास वेळ वाढणार आहे.