पुण्यातील ट्रॅफिक पोलिसांच्या अनेक घटना सध्या ऐकायला मिळत आहेत. सोशल मीडियावर देखील हल्ली पुणे पोलीस ट्राफिक यांच्या बद्दलच्या अनेक तक्रारी, फोटोज, व्हिडिओज पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओच्या मदतीने दोन पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे.
पुण्यातील ट्रॅफिक पोलिसांच्या अनेक घटना सध्या ऐकायला व पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर अनेक नागरिकांनी काही फोटोज, व्हिडिओ शेअर केलेले आहे. या व्हिडिओच्या मदतीनेच पोलीस प्रशासनाने पुण्यातील दोन ट्राफिक पोलिसांचेवनिलंबन देखील केले आहे. सोशल मीडियाचा योग्य वापर करून एखाद्या व्यक्तीला न्याय मिळू शकतो, याचे प्रत्यक्ष उदाहरण यावेळी घडताना पाहायला मिळाले.
वाहन चालकाकडून लाच घेतल्याप्रकरणी या दोन पोलिसांचे थेट निलंबन देखील करण्यात आले आहे. बाळू दादा येडे आणि गौरव रमेश उभे या निलंबन करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची ही नावे आहेत. हे दोन्ही कर्मचारी पुणे येथील स्वारगेट वाहतूक विभागामध्ये वाहतूक पोलीस होते.
प्रफुल्ल सारडा या व्यक्तीने त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून 17 मे 2023 रोजी गंगाधाम आई माता मंदिर रस्ता या ठिकाणी वाहतूक पोलीस नागरिकांकडून कसे पैसे लाच स्वरूपामध्ये घेतात? या संदर्भातील एक व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओमुळे सगळीकडे पुणे वाहतूक पोलिसांबद्दल चर्चा होऊ लागली.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वाहनचालकावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर प्रक्रिया न करता वाहन चालकांकडून पैसे घेण्याचा प्रकार घडत होता आणि हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याने या व्हिडिओची पुन्हा तपासणी करण्यात आली. तपासणी अंतिम विभागीय चौकशी कार्यवाहीनुसार या दोन्ही पोलिसांचे थेट निलंबन करण्यात आले.
हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला तर यामध्ये ट्रॅफिक पोलिसांनी नियमांचं उल्लंघन केल्यामुळे सुरुवातीला वाहन चालकाला थांबवले होते परंतु त्यानंतर काही न बोलता थेट पैसे घेतल्याचे स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये दिसत होते. ही सारी घटना कॅमेरा मध्ये कैद झालेली आहे. पोलिसांनी केलेल्या या लाचखोरी प्रकरणामुळे या दोन्ही वाहतूक पोलिसांना थेट निलंबनाची शिक्षा भोगावी लागली.
सोशल मीडियाचा वाढता वापर यामुळे नागरिक जागृत झालेले आहे. नागरिक आता प्रत्यक्ष पत्रकारांची भूमिका बजाऊ लागलेले आहे म्हणूनच कोणतीही घटना जर आजूबाजूला घडत असेल तर त्याचे थेट व्हिडिओमध्ये रूपांतर करून सोशल मीडिया वर्वअपलोड करत असतात म्हणूनच नागरिकांच्या अशा प्रकारच्या कृत्यामुळे चांगल्या गोष्टी देखील घडताना दिसत आहे. शेअर केलेले या व्हिडिओ मुळे वाहतूक पोलीस कर्मचारीचे निलंबन देखील झाले आहे.
घडत असलेल्या सुट्टीच्या घटनांमुळे वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांच्या चुकीच्या हरकतीमुळे पुणे येथील पोलिसांची प्रतिमा मलिन होत आहे,अशा प्रकारच्या चर्चा देखील केल्या जात आहे परंतु पुणे पोलिसांनी घेतलेल्या योग्य निर्णयामुळे पोलिसांची मलिन प्रतिमा आता स्वच्छ झाली आहे असे देखील अनेक नागरिक म्हणत आहेत. पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक देखील केले जात आहे.