पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरात वाहतूकची कोंडी मोठ्या प्रमाणावर जाणवते. ही कोंडी कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे रिंग रोडचे बांधकाम हाती घेतलेले आहे. हा प्रकल्प संपूर्ण आणि वेळेत लवकर पुणे शहरातील खूप मोठी वाहतूक कोंडी नियंत्रणात येऊ शकते, त्याचबरोबर हा प्रकल्प लवकरात लवकर जलद गतीने पूर्ण व्हावा यासाठी शासनाने शर्तीचे प्रयत्न सुरू ठेवलेले आहे. पुणे जिल्ह्यातील नागरिकांना देखील हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, यामुळे पुणे शहराचे विकास नक्कीच होईल तसेच शहरातील वाहतूक कोंडी देखील दूर करण्यात येईल.
या महामार्गावरील रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी काही जमिनी देखील ताब्यात घेण्यात येणार आहे,, अशी माहिती मिळाली आहे. प्रकल्पग्रस्तांना जमिनीच्या बदल्यात मिळणारा मोबदला आणि जमीन ताब्यात घेण्याच्या नोटीस जून अखेरपर्यंत पाठवल्यास सुरुवात होणार आहे तसेच एकदा लोकांना नोटीस मिळाल्यानंतर जमिनी ताब्यात घेतले जातील आणि त्यानंतर प्रकल्प सुरू करून महामार्गाचे काम हाती घेतले जाईल.
शासनाने या प्रकल्पाच्या गुणवत्तेसाठी स्थिर मूल्यांकन करण्याची सूचना देखील दिलेली आहे. या सूचनेनुसार पश्चिम भागातील रिंग रोडचे हे मूल्यमापन पूर्ण झालेले आहे आणि पूर्व भागातील मूल्यांकनाचे काम देखील येणाऱ्या दहा दिवसात पूर्ण होईल, त्याचबरोबर या फेर प्रकल्पामुळे प्रकल्पग्रस्तांना जे मोबदली द्यायचे आहेत ते अपडेट केले जातील.
या फेरफार मूल्यांकनानंतर जून महिन्याच्या शेवटी प्रकल्पग्रस्तांना किती जमीन द्यायची आहे त्यांची किती जमीन संपादित केलेली आहे त्याबद्दल किती मोबदला द्यायचा आहे? या संदर्भातील एकंदरीत माहिती असलेली नोटीस देखील दिली जाईल. शासनाला जे लोक स्वतःहून जमिनी देतील त्यांना अतिरिक्त मोबदला देखील देण्याचे ठरवलेले आहे.
पुणे रिंग रोडचे एकूण लांबी ही 172 मीटर आणि 110 रुंदी मीटर आहे. हा मार्ग दोन भागांमध्ये विभागला जाणार आहे. पश्चिम रिंग रोड आणि पुणे रिंग रोड असे या प्रकल्पाचे विभाजन करण्यात येईल. पूर्ण करण्यासाठी जवळपास सतराशे एक हेक्टर जमीन घेतली जाणार आहे.
हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 39 378.73 कोटी खर्च होईल असे देखील सांगितले जात आहे. सध्या मूल्यांकन प्रक्रिया सुरू असल्याने अनेक प्रक्रिया पार पाडल्या जात आहेत. या सर्व अधिकृत प्रक्रिया पार पाडल्यानंतर जमीन संपादित करण्याचा मार्ग सुरू केल्या जाईल आणि लवकरच पुणे रिंग रोड बांधकामाची सुरुवात देखील केली जाईल.
हे हि वाचा : फक्त इतकी शिकलेली आहे गौतमी पाटील, शिक्षणा मुळे पुन्हा आली चर्चेत!