पुणेकरांना मेट्रो करिता पहावी लागणार महिनाभर वाट, नागरिकांनी व्यक्त केला संताप…

29

पुणेकरांना मेट्रो प्रवासाकरिता तारीख पे तारीख सारखी वाट पहावी लागत आहे. या मेट्रो प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी सी एम आर एस घेत आहे परंतु सीएमआरएस करून वारंवार तारीख व तारीख दिली जात आहे. या कारणामुळे पुणे मेट्रो साठी उशीर होत आहे. हा प्रकल्प कधी सुरू होणार? याबाबत देखील अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत.

गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक आणि फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय दरम्यान मेट्रो सुरु करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा तयार आहेत परंतु सीएमआरएस यांची अद्याप मान्यता मिळाली नाहीये, म्हणून महाराष्ट्र मेट्रोचे काम गेल्या महिन्यापासून थांबलेले आहे याचा परिणाम पुणेकरांना भोगावा लागत आहे.

ज्या ठिकाणी सध्या मेट्रो सेवा सुरू आहेत, अशा स्थानकाच्या सुरक्षेवरून देखील वाद निर्माण झालेला आहे त्यामुळे कोर्टकचेरी तसेच सी ओ इ पी यांच्याकडून अहवालामध्ये अनेक त्रुटी निर्माण झालेले आहे तसेच पंतप्रधान कार्यालयाच्या व सी एम आर एस यांच्या तक्रारी या सर्व गोष्टींमुळे पुणे प्रकल्पाला ब्रेक लागलेला आहे.

गेल्या वर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले होते, त्यावेळी काही निशकांशी पूर्तता करून सी एम आर एस ने काही सेवा सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती परंतु त्यानंतर एक वर्ष उलटला असला तरी या मार्गातील अनेक कामे अपूर्ण आहेत. प्रवशंकरिता मेट्रोसाठी एक मार्ग सुनिश्चित करण्याचे काम देखील हाती घेण्यात आलेले आहेत.

डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी उद्यान या दोन स्थानकावर प्रवाशांकरिता प्रवेश मार्ग उभारले गेले आहेत अंतिम काम देखील पूर्ण होण्याच्या वाटेवर आहेत.

या प्रकल्पाचे उद्घाटन करत असताना पालकमंत्र्यांनी विविध सूचना दिल्या होत्या परंतु या सूचनांचा देखील विसरता पडलेला दिसून येतो आहे. हा प्रकल्प एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण व्हायला हवा तसेच मेट्रोची सर्व कामे दिलेल्या वेळेत पूर्ण होणे अपेक्षित आहेत तरी ही कामे मे आणि जून दोन महिने पुढे ढकलण्यात आलेले आहे. ही सेवा पुढील टप्प्यापर्यंत लवकरच सुरू होईल याकरिता डेडलाईन दिली जात आहे. ही सेवा प्रत्यक्षात कधी सुरू होईल याबाबत अजून कोणतेही कल्पना दिली जात नाहीयेत म्हणूनच या सर्व संदर्भात नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात रोष पाहायला मिळत आहेत. पुणेकर संतापलेले आहेत. या प्रकाराचा निषेध देखील वेगवेगळ्या स्तरातून केला जात आहे.