Pune railway station : पुणेकरांच्या प्रवासाला ब्रेक लागणार आहे. पुण्यातील रेल्वे स्टेशन यापुढे नेहमी चार तास बंद राहणार आहेत, यामुळे अनेक रेल्वे गाड्या भविष्यात रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लवकर वेळेत पोहोचण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वेने प्रवास केल्याने वेळ ही कमी लागतो आणि हवे असलेल्या ठिकाणी वेळेतही पोहोचता येते.
दर दिवसाला लाखो प्रवासी मुंबई- पुणे व अन्य इतर ठिकाणी प्रवास करत असतात. इतके सगळे असतानाच पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी हाती आली आहे. या बातमीनुसार भविष्यात पुणे रेल्वे स्टेशन दररोज चार तासांसाठी बंद ठेवण्यात येईल, असा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलेला आहे यामागील कारण देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
हल्ली रेल्वे स्थानकाचे फलाट विस्तारीकरणाचे काम चालू आहे.या कामामुळे रेल्वे स्थानक पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल. सुरू होणाऱ्या कामामुळे भविष्यात रेल्वेचे वेळापत्रक देखील कोलमडेल अशी आशा देखील व्यक्त करण्यात येत आहे.
BIG BREAKING NEWS : सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या; ठाकरे गटातला वाद चव्हाट्यावर WATCH VIDEO
या सर्व गोष्टीमुळे प्रवासांचे हाल होतील, ज्यावेळी पुणे रेल्वे स्थानक बंद राहील त्यादरम्यान एक ही रेल्वे गाडी प्रवास करणार नाही. रेल्वे गाडी सुरू नसल्याने याचा विपरीत परिणाम लांब पल्ल्यांच्या गाडीवर देखील होईल. पुणे स्थानकाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे अनेक अडचणी पुणेकरांना सोसाव्या लागणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे स्थानकाचे रीमॉडेलिंग चे काम थांबून होते परंतु आता रेल्वे प्रशासनाने हे रीमॉडलिंगचे काम तीन महिन्याच्या आत करण्याचे ठरवले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये पावसाळा किंवा अन्य काही तांत्रिक गोष्टीची वाट न पाहता लवकरात लवकर काम सुरू करावे, असे आदेश देखील देण्यात आलेले आहेत.
यानुसार लवकरच फलाट विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात येईल आणि वेळेच्या आत पूर्ण केले जाईल, असे देखील रेल्वे प्रशासनाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे रेल्वे वाहतूक आणि प्रवासी यांच्या प्रवासामध्ये अडचण निर्माण होणार आहे.
तसे पाहायला गेले तर पुणे रेल्वे स्थानकातून दिवसाला एकंदरीत 155 पेक्षा जास्त रेल्वे गाड्या धावतात त्यापैकी 65 रेल्वे या पुणे स्थानकातून सुटतात. पुण्यातून एका दिवसात दीड लाखापेक्षा जास्त प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात.
रेल्वे प्रशासनाने हाती घेतलेल्या कामामुळे एकंदरीत प्रवाशांचे देखील हाल होणार आहे,असे प्रवासी संघटने द्वारे म्हटले जात आहे. या फलाटाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू झाल्याने भविष्यात हडपसर आणि शिवाजीनगर या स्थानकातून काही गाड्या सोडण्याचे नियोजन देखील करण्यात आलेले आहे त्यामुळे पुढील तीन महिने प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.