पुणे : पुण्यात कोरोना आवाक्याबाहेर जात असल्याने आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांसह विनाकारण रस्त्यांवर उतरणाऱ्यांना धडा शिकविण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. लॉकडाउन शिथिलेतत वेळापत्रक ठरवून सरसकट दुकाने उघडणाऱ्या दुकानदारांचे परवाने रह होणार आहेत; तर ज्या कुठच्या हॉटेलसमोर ग्राहकांची गर्दी दिसेल, तिथेही कारवाई असेल. त्यापलीकडे मास्क न बांधता फिरणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
कोरोनाला अटकाव घालण्याच्या उद्देशाने विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी नवा आदेश काढून, बेजबाबदारी व्यापारी, नागरिकांवर कारवाईच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. एका बाजारपेठांमधील तेही त्या-त्या रस्त्यांवरील दुकाने दिवसाआड सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. तरीही बहुतांशा दुकाने उघडली जात आहेत. या पार्श्वभूमीवर कठोर उपाय राहणार आहेत.
शहरातील रोजच्या रुग्ण संख्येचा आकडा आठशेच्या पुढे जात आहे. तर मूत्यु वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारसह स्थानिक प्रशासनाची चिता वाढली आहे. दुसरीकडे, १०९ बाधित क्षेत्रांसह नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब विभागीय आयुक्तांनी गांभीर्यने घेतली आहे.
शहरातील बाधित क्षेत्रातील नागरिकांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना करताना अगदी, चौकात गप्पा मारणे, पत्ता खेळणे, बाजारात गर्दी करणाऱ्याविरोधात कारवाईचा आदेश म्हैसेकर यांनी दिला आहे. या भागांतील वचक ठेवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींवर जबाबदारी सोपविण्याचा सल्ला म्हैसेकर यांनी महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
सध्या मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यांवर येत असल्याकडे लक्ष वेधत म्हैसेकर यांनी बाधित क्षेत्रासह सर्व भागांत ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचा आदेशही म्हैसेकर यांनी दिला आहे. त्याशिवाय, लग्ना समारंभात गर्दी झाल्यास संबंधित कार्यालयाचाही परवाना रद्द होणार आहे.