Pune Prahar : कूलरचा फॅन फिरवला नाही म्हणून पत्नीवर चाकूने वार

272

येरवडा : कूलरचा फॅन फिरवला नाही म्हणून पतीने पत्नीवर चाकूने वार केले. विश्रांतवाडी मधील शांतीनगर इलेव्हन स्टार मित्र’मंडळ जवळ हा प्रकार घडला याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसानी रोहित मोरे (वय 31रा.शांतीनगर) याला अटक केली आहे. याप्रकरणी सागर आल्हाट यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, रोहित मोरे लष्करात कुक म्हणून कामाला आहे श्रीनगरला त्यांची पोस्टिंग असून मागील दीड महिन्यापासून तो सुट्टीवर होता बायकोच्या चारित्र्याच्या संशय घेत. असे यावरून त्यांचे नेहमी भांडणे होतं असे रविवारी पहाटे कुलरचा फॅन त्याच्याकडे कर म्हणून सांगितले असता ते केले नाही म्हणून घरातील सुरीने पत्नीच्या छातीवर, पोटावर हातावर तोंडावर वारं केले.

यानंतर त्याने स्वतःच्या गेल्यावरही वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्या महिलेस रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती गंभीर आहे. याची महिती पोलिसांना समजताच पोलीस उपायुक्त पंकज देशमुख,सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड. गुन्हे निरीक्षक रवींद्र कदम यांनी पोलीस घटनास्थळी धाव घेतली याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केले आहे. सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यादव करीत आहे.