Pune News : खंडाळ्यात ट्रेकिंगसाठी गेला, 200 फूट खोल दरीत कोसळला अन् …

173

खंडाळ्याच्या मंकिहिल पॉईंट येथील200 फूट खोल दरीत पडलेल्या एका तरुणाला रिक्षाचालकाच्या प्रसंगावधनाने जीवदान मिळाले असून बचाव पथकांकडून त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

Pune News : देव तारी त्याला कोण (Pune news) मारी हे आपण ऐकलं आहे. मात्र याचीच प्रचिती पुण्यातील खंडाळ्यात आली आहे. खंडाळ्याच्या मंकीहिल पॉईंट येथील दरीत 200 फूट पडलेल्या एका तरुणाला रिक्षाचालकाच्या प्रसंगावधनाने जीवदान मिळाले असून बचाव पथकांकडून त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. रात्री 11 वाजता सुरू झालेले रेस्क्यू ऑपरेशन तीन तासाने म्हणजे मध्यरात्री 2 वाजता संपले. हरिश्चंद्र मंडल ( वय – 25,  मूळ रा. ओरिसा, सध्या गोवा) असे या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिश्चंद्र हा पर्यटनासाठी आणि खास करून ट्रेकिंगसाठी गोवा येथे क्रॉम्प्टन कंपनीमध्ये सुपरवायझर पोस्ट वरती काम करत आहे. गुरुवारी तो खंडाळा घाटामध्ये ट्रेकिंगसाठी आला होता. खंडाळ्यातील वाघजई मंदिरापाठीमागे मंकीहिल भागातील डोंगरात फिरत असताना तो रस्ता चुकला आणि संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास पाय घसरून सुमारे 200  फूट खोल दरीमध्ये पडला.