Pune Crime : पुण्यात एकतर्फी प्रेमातून खून ; आरोपीला …

79

पुणे : एकतर्फी प्रेमातून खून ; खडकी परिसरात भररस्त्यात महिलेचा खून करणाऱ्यास खडकी पोलिसांनी कर्नाटकातील विजापूर येथून अटक केली. एकतर्फी प्रेमातून आरोपीने महिलेचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे.

नासेर बिराजदार (रा. खडकी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. रजनी राजेश बैकेल्लु (वय ४४,रा. बोपोडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजनी यांच्या पतीचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. पतीच्या निधनानंतर त्या ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरीस लागल्या.

आरोपी नासेर बिराजदार रिक्षाचालक आहे. नासेर हा रजनी यांच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. परंतु रजनी यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने सोमवारी सकाळी नासेर आणि साथीदाराने रजनी यांना रस्त्यात अडवून चाकूने वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या रजनी यांचा मृत्यू झाला होता. खडकी पोलिसांनी पथकाने विजापूर येथून आरोपी नासेरला अटक केली.