पुणे | चित्रपटगृहात सिनेमा पाहण्यासाठी तरुणीला घेऊन गेल्यानंतर ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजले. लॉजवर नेवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिच्याकडून 35 हजार रूपये घेउन संबंधीत तरुणीचे न्युड फोटो व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार चंदननगर खराडी परिसरात समोर आला आहे.
याप्रकरणी मुकेशकुमार जाखड (24, रा. चंदननगर, मूळ- राजस्थान) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणी आणि मुकेशकुमार यांच्यात ओळख झाली होती. त्यानंतर त्याने पिडीत तरूणीला सिनेमा पाहण्यासाठी नेले. त्याठिकाणी ड्रिंक्समध्ये गुंगीचे औषध मिसळून, तिला लॉजवर नेले. त्याठिकाणी जबरदस्तीने अत्याचार करून तरूणीचे फोटो व्हारयल करण्याची धमकी दिली.
दरम्यान, त्यानंतर काही दिवसांनी आरोपीने तरूणीला राजस्थानातील जयपूरमध्ये बोलावून पुन्हा अत्याचार केले. एवढेच नाही तर तिच्याकडून 35 हजार रूपये फोन पेवर घेतले.
त्याशिवाय मुकेशकुमारने तरूणीचे न्यूड फोटो व्हायरल करून बदनामी केली. दोघेही मुळचे राजस्थानचे आहेत. पिडीत तरुणीच्या नातेवाईकांच्या घराशेजारी आरोपी रहात होता. तसेच ते राजस्थानमध्ये एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. पुढील शिक्षणासाठी पिडत तरुणी पुण्यात आली होती. चंदनगर पोलिस पुढील तपास करीत आहेत.