शाकाहारावरील सचित्र पुस्तकाचे अशोक गेहलोत यांच्या हस्ते प्रकाशन 

14
पुणे : शाकाहार पुरस्कर्ते, सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल लिखित ‘सुखी जीवन का आधार : शाकाहार’ या शाकाहारावरील सचित्र पुस्तकाचे प्रकाशन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या हस्ते झाले. राजस्थानमधील उदयपूर येथे ग्लोबल प्राकृत जैनोलोजी सेंटरमध्ये नुकताच हा कार्यक्रम झाला.
आचार्य श्री वर्धमान सागर महाराज संघ यांच्या मंगल सान्निध्यात हा कार्यक्रम झाला. यावेळी जैन समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. गंगवाल यांना यावेळी त्यांच्या अहिंसा, शाकाहार, प्राणी संरक्षण व जैन जीवनशैलीच्या प्रचार व प्रसाराच्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “आचार्य श्री वर्धमान सागर महाराज व मुख्यमंत्री गेहलोत यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणे आनंदाची गोष्ट आहे. लहान वयातच शाकाहाराविषयी मुलांना माहिती व्हावी, यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. त्यामध्ये अनेक चित्रे, आकृत्या, कार्टून्सच्या माध्यमातून रंजकपणे शाकाहाराचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला आहे.”