धामापूर जिल्हा परिषद गटाचा आमदार शेखर निकम यांना जाहीर पाठिंबा

34
e70f9256-6f27-497e-bbd2-edf88a3fe99f

माखजन : (विलास गुरव) : बदलत्या राजकीय घडामोडी, अजित पवार यांनी भाजप शिवसेना सरकार मध्ये सामील होत उपमुख्यमंत्रीपदाची घेतलेली शपथ आणि आमदार निकम यांनी अजित दादा ना दिलेला पाठिंबा या पार्श्वभूमीवर मतदार संघात हा निर्णय किती मान्य आहे हे पाहणं औचित्यच होते.

चिपळूण-संगमेश्वर मतदार संघात आमदार निकम यांना मात्र पाठिंबा कायम असून राष्ट्रवादीचा मतदार आमदार निकम यांचा पाठीशी ठाम असल्याचे चित्र दिसून येत आहे. चिपळूण पाठोपाठ संगमेश्वर तालुक्यात देखील आमदार निकम यांना पाठिंबा दर्शविण्यात आला आहे.

खाडीपट्ट्यातील धामापूर जिल्हा परिषद गट हा आमदार निकम यांचा सोबत असल्याचे चित्र अलीकडच्या कालावधीत दिसून आले आहे.

याचं जिल्हा परिषद गटातून सर्व पदाधिकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत आमदार निकम यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर करत आम्ही तुमचा निर्णयाबरोबर आहोत,सर ठरवालं ते धोरण आणि बांधाल ते तोरण आम्ही सदैव तुमचा सोबत अश्या भावना पदाधिकारी कार्यकर्त्यांमधून व्यक्त करण्यात आल्या.

यावेळी उपस्थित जिल्हा युवक उपाध्यक्ष सुशील भायजे,विभाग अध्यक्ष महेश बाष्टे,तालुका उपाध्यक्ष शेखर उकार्डे,जिल्हा चिटणीस गजानन सुर्वे,माजी जील्हा परिषद सदस्य दीपक जाधव, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश कांगणे, शशिकांत घाणेकर,धामापूर पंचायत समिती अध्यक्ष गणपत चव्हाण,माजी विभाग अध्यक्ष अमित माचिवले,युवक वक्ता सेल तालुका अध्यक्ष अक्षय चव्हाण,धामापूर सरपंच श्री.भायजे,बबु कवळकर,रुपेश गोताड, सुबोध चव्हाण,युवक राष्ट्रवादी आरवली पंचायत समिती अध्यक्ष प्रवीण भुवड,दीपक शिगवण,शैलेश चव्हाण,सिद्धार्थ पवार,वैभव मते,बंड्या कवळकर,शफी शहा,प्रकाश जड्यार आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.