IMP NEWS : पावसाळा काही दिवसांच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेला आहे. या आधीच शहरातील साफसफाई करण्याचे काम जोरात चालू आहे. त्याचबरोबर पुणे शहरातील तसेच राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाळा पूर्व तयारी देखील मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.
योग्य ती खबरदारी बाळगून पावसाळ्यात सर्वसामान्य नागरिकांचे हाल होऊ नये याकरिता अनेक ठिकाणी पावसाळापूर्व कामांची सुरुवात देखील झालेली आहे. कामांचे नियोजन करत असताना काही ठिकाणी वाहतुकीचे नियम व वाहतुकीचे मार्ग देखील बदलण्यात आलेले आहे.
मुंबई बेंगलोर महामार्ग जवळच असलेल्या हिंजवडी येथील भुजबळ चौक ते सयाजी अंडरपास सर्विस रोडवर पावसाळा पूर्व कामांची तयारी केली जात आहे. या कामामुळे महामार्गावरील वाहतूक ही 31 मे पर्यंत बदलली जाईल. हा मार्ग व त्यावरील वाहतूक वेगळ्या मार्गाने केली जाईल, असे आदेश पोलीस उपायुक्त डॉक्टर काकासाहेब डोळे यांनी दिलेले आहेत.
या मार्गावर पावसाळ्यात नागरिकांना अनेक समस्या सहन कराव्या लागतात तसेच जास्त पावसामुळे या भागात पाण्याचा निचरा देखील योग्य होत नाही. या साचलेल्या पाण्यातून वाट काढणे नागरिकांसाठी मुश्किल होऊन बसते, अशावेळी अनेक दुर्घटना देखील घडतात या गोष्टीचे भान राखूनच पावसाळापूर्वी काही दुरुस्तीचे कामे करण्याचे ठरवले आहे.
या कामाचे नियोजन करत असतानाच वाहतुकीच्या मार्गामध्ये देखील बदल करण्यात आलेले आहे, हे बदल पुढील प्रमाणे आहेत…
सूर्य अंडर पास सर्विस रोडने वाकड नका मार्गे सयाजी अंडरपास या दिशेने जाणारे सर्व प्रकारचे वाहने आता इंडियन ऑइल चौक कस्तुरी चौक भुमकर चौक मार्गे जातील.
इंडियन ऑइल चौकाकडून सर्विस रोडने वाकड नाका मार्गे सयाजी अंडरपास व वाकड गावाकडे जाणारी संपूर्ण वाहतूक आता सावता माळी मंदिर येथून वाकड फ्लायओव्हर ब्रीज वरून जातील.
इंडियन ऑइल चौकाकडून सर्विस रोडने वाकड नाका सयाजी अंडरपास न्यूटन वाकड नाका सातारा लेन मार्गे हायवे रोडला जाणारी सगळी वाहतूक वाकड ब्रिज वरून वाकडगाव यु टर्न घेतील व वाकड नाका सातारा लेन मार्गे हायवे रोडने प्रवास करतील.