Pidilite च्या ऑनलाइन बीटूबी प्लॅटफॉर्म Genie ने  रु. १००० कोटींपेक्षा जास्त विक्री केली आहे

101

भारत : बांधकाम व्यवसायात लागणारी चिकट द्रव्ये आणि विशेष रसायनांचे आघाडीचे उत्पादक Pidilite Industries ने आज घोषणा केली की, त्यांच्या ऑनलाइन बीटूबी डीलर ॲप्लिकेशन Genie ने आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये रु.१००० कोटींपेक्षा जास्त विक्रीचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. त्याच्या प्रभावी वाढीच्या दरासह Pidilite Genie ने आर्थिक वर्ष २३ मध्ये Pidilite च्या एकूण व्यवसायात १४% योगदान दिले आहे.

Pidilite Industries चे उपव्यवस्थापकीय संचालक श्री. सुधांशु वत्स म्हणाले, Pidilite मध्ये आमचे सर्वोच्च प्राधान्य आमच्या डीलर्सना त्यांची व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सक्षम करून त्यांना पाठिंबा देणे हे आहे. म्हणूनच आम्ही किरकोळ विक्रेत्यांना डिजिटल झेप घेण्यात मदत करण्याच्या उद्देशाने Pidilite Genie हे ॲप्लिकेशन बाजारात आणले. Pidilite Genie ने कमी कालावधीमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे हे सांगायला आम्हाला खूप अभिमान वाटतो. जवळपास पाच लाख डीलर्सनी Pidilite Genie इंस्टॉल केले असून ते बाजारात आल्यापासून जवळजवळ १८ लाखांपेक्षा जास्त ऑर्डर्सची सुविधा याद्वारे दिली गेली आहे. आमच्या डीलर्सच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही हे व्यासपीठ सतत सुधारित करून अधिक समृद्ध करीत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की, Pidilite Genie मध्ये नजीकच्या भविष्यात सर्व ऑर्डर देता येणारे सहज व कधीही कोठेही वापरता येणारे असे ‘गो-टू’ व्यासपीठ बनण्याची क्षमता आहे.”

वापरकर्त्यांसाठी अनुकूल अशा इंटरफेससह तयार केलेले Pidilite Genie हे डीलर्ससाठी अगदी काही क्लिकसने  Pidiliteच्या उत्पादन श्रेणीमधील कोणतेही उत्पादन ऑर्डर करण्यासाठी एकाच ठिकाणी सर्व काही मिळू शकेल असे ऑनलाइन व्यासपीठ आहे. या ॲपमधील इंटलिजन्ट तंत्रज्ञान (AI) डीलरने पूर्वी केलेल्या खरेदीच्या रेकॉर्ड्स ठेऊन त्या वापरकर्त्त्याच्या खरेदीच्या पॅटर्नप्रमाणे  विविध पर्याय सुचवून खरेदीची प्रक्रिया सुव्यवस्थित व सोपी करते. यामध्ये डीलर्स वर्तमानात चालू असलेल्या योजना पाहू शकतात, लॉयल्टी पर्फॉर्मन्सचा मागोवा घेऊ शकतात आणि भविष्यातील खरेदीवर मिळालेले स्किम रेवॉर्ड्स वापरू शकतात.

पुढे भविष्याकडे पाहता, Pidilite Genie ला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लॉंच करून डीलर्सना Pidilite च्या संपूर्ण व्यावसायिक क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी Pidiliteच्या सर्व उत्पादन श्रेणी व सेवांचा विस्तार करून वापरकर्ता आधार अनेक पटींनी वाढवण्याची योजना आहे. Pidilite Genie ॲप स्वतःमध्ये  बहुभाषिक इन्टरफेस व ॲपअंतर्गत सानुकूलित परस्परसंवाद, व्हॉइस टू टेक्स्ट कार्यक्षमता, ऑर्डरच्या प्रवासाची दृश्यमानता, डीलर्सना त्यांच्या कार्यप्रदर्शनाचा मागोवा घेण्यास व नियोजन करण्यास मदत करणे यांसारखी रोमांचक नवीन वैशिष्ठ्ये देखील जोडेल.

Pidilite Genie सतत स्वतःला सुधारत व विकसित करत असतानाच डीलर्ससाठी अगदी बारा महीने तेरा काळ म्हणजे निरंतर डिजिटल सहाय्यक बनण्याचे त्याचे उद्दिष्ट असून खरेदी करण्यासाठी व ऑर्डर देण्यासाठी प्राथमिक माध्यम बनण्याचा त्याचा प्रयत्न आहे. आपल्या नवीन कार्यप्रणाली पद्धतीसह Pidilite Genie  भविष्यात त्याची वाढ सुरू ठेवण्यासाठी सज्ज आहे.