पुरंदर (दत्ताञय फडतरे ) : पुणे जिल्ह्यातील पुरंदर मधील बोपगांव येथील कानिफनाथ गडावर दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान बोपगाव येथील कानिफनाथ गडावर भव्य दहिहंडी कार्यक्रम ,सोमवार ,दिनांक तीन सप्टेंबर रोजी होणार आहे.पहाटे पाच ते सात नाथांचा अभिषेक होईल .अकरा वाजता भजनाचा कार्यक्रम ,दुपारी बारा वाजता महाआरती दहिहंडीचा कार्यक्रम होणार आहे, सर्व भाविकांनी दहीहंडी उत्सवात सहभागी व्हावे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा,असे आवाहन नवनाथ देवस्थान पंचायत कमिटी ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळ बोपगांव यांनी केले आहे.